मुंबई : शेतकरी आता धान-गहू याशिवाय अन्य पिकांची शेती करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. फळबाग लागवडीनंतर आता भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढताना दिसून येत आहे. हजारो रुपये उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता लाखो रुपये मिळवू लागले आहेत. आता आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. या शेतकऱ्याचे भाग्य भाजीपाला लागवडीमुळे उजाळले. वर्षभरात या शेतकऱ्याने भाजीपाला विक्रीतून १० ते १२ लाख रुपयांची कमाई केली.
आज तकच्या रिपोर्टनुसार, राजस्थानातील भीलवाडा येथील हा शेतकरी आहे. रामेश्वर सुथार असं यांचं नाव. रामेश्वर हे खूप शिकलेले नाहीत. त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. सुरुवातीला ते इलेक्ट्रिक मोटार रिवायडिंगचा काम करत होते. त्यात त्यांचे मन लागत नव्हते. अशात त्यांचा परिचय महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी उमेश गाडे यांच्याशी झाला. उमेश गाडे यांच्याकडून रामेश्वर यांनी शेती समजून घेतली.
रामेश्वर सुथार यांनी पाच वर्षांसाठी जमीन भाड्याने घेतली. या शेतीत ते स्ट्राबेरी उगवतात. यातून त्यांना लाखो रुपये मिळत आहेत. उमेश गाडे यांचे उत्पन्न पाहून रामेश्वर यांनीही शेती सुरू केली. त्यानंतर रामेश्वर यांनी भाजीपाल्याची लागवड केली. टमाटर, शिमला मिरची आदींची लागवड केली. याशिवाय ते गोबीचेही उत्पन्न घेतात. यातून रामेश्वर यांना चांगला फायदा झाला.
रामेश्वर सुथार यांनी एक टमाटर ग्रेडिंग मशीन बनवली आहे. या मशीनने ते वेगवेगळ्या आकाराचे टमाटर वेगळे काढतात. त्यानंतर पॅकेजिंग करून बाजारात पाठवले जाते. आता ते औषध फवारणी मशीनही बनवणार आहेत.
ड्रीप एरिगेशनच्या माध्यमातून ते सिंचन करतात. यामुळे पाण्याची बचत होते. रोपांना चांगले पाणी मिळते. सध्या ते वर्षभर भाजीपाला विकून १० ते १२ लाख रुपये मिळवतात. याशिवाय ते इतर पिकांचेही उत्पन्न घेतात.