शिर्डी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन नगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे आंदोलन सुरु करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा आणि राज्यात सर्वत्रच आंदोलनाला सुरवात होऊ लागल्याने अखेर (Agriculture Minister) कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोनकर्त्यांची भेट घेतले आणि त्यांची शिष्टाई ही कामी आली होती. आंदोलन स्थगित असले तरी (Farmer) शेतकरी हे मागण्यांवर ठाम आहेत. आता मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित मंत्र्यांची आंदोलक हे भेट घेणार आहेत. या दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका यावर चर्चा होणार असून या बैठकीनंतर आंदोलक आपली दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत अनेक प्रश्न निकाली निघतील अशी आशा आंदोलकांनाही आहे.
पुणतांबा येथील आंदोलनाची सुरवात ही ग्रामसभेतील एकमतानंतरच झाली होती. आता उद्या बैठकीत काही तोडगा निघाला तरी आंदोनाबाबत निर्णय मात्र, पुणतांब्याच्या ग्रामसभेतच होणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध अशा 16 मागण्या घेऊन हे आंदोलन सुरु झाले आहे. 1 जून रोजी आंदोलनाला सुरवात झाली तर दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी संवाद साधला व राज्य सरकारशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन जरी स्थगित झाले तरी मागण्या कायम आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होतंय ते पाहणे महत्वाचे राहणार आहे.
शेतकरी आणि राज्य सराकार यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीला किसान क्रांती कोअर कमिटीचे सदस्य तसेच आंदोलक उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरी त्यावर शेतकरी कितपत समाधानी आहेत याबाबत निर्णय़ हा गावच्या ग्रामसभेतच होणार आहे. आंदोलन सुरु राहणार का स्थगित केले जाणार याचा निर्णयही सर्वानुमते घेतला जाणार आहे.
पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला एक ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळेच 5 वर्षानंतर पुन्हा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पुन्हा पुणतांब्यातच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. शेतकऱ्यांनी सरकार समोर 16 मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्या मागण्या मान्य होतील आणि कोणत्या मागण्यांवर निर्णय होणार नाही यावरच आंदोलनाची दिशा ठरणार आहे. ऊस पिकाच्या अनुदानापासून ते वन्यप्राण्यांमुळे झालेले नुकसानभरपाई संदर्भातल्या मागण्या शेतकऱ्यांच्या निवेदनात आहेत.