Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर

शेतामधील उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दर यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, बाजारपेठेतील दराची माहिती नसल्यामुळे शेतकरी उत्पादन निघाले की थेट विक्रीसाठी घेऊन जातो. त्यामुळे सरासरीपेक्षा दर कमी असताना त्याला शेतीमालाची विक्री करावी लागते. मात्र, काळाच्या ओघात तंत्रज्ञानामुळे सर्व गोष्टी आता मोबाईलवर मिळत आहेत.

Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 3:24 PM

पुणे : शेतामधील उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दर यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, बाजारपेठेतील दराची माहिती नसल्यामुळे शेतकरी उत्पादन निघाले की थेट विक्रीसाठी घेऊन जातो. त्यामुळे सरासरीपेक्षा दर कमी असताना त्याला शेतीमालाची विक्री करावी लागते. मात्र, काळाच्या ओघात तंत्रज्ञानामुळे सर्व गोष्टी आता मोबाईलवर मिळत आहेत. अगदी त्याच प्रमाणे (Maharashtra State Agricultural Marketing Board) महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने शेतकऱ्यांना (Agricultural Goods) शेतीमालाचे दर घरबसल्या माहिती व्हावेत याकरिता मोबाईल अॅप बनवण्यात आले आहे. त्यामुळे विविध बाजार समित्यांमधील दरांची तर माहिती होणार आहेच पण बाजार समितीमधील शेतीमालाची आवक-जावक याची देखील अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या बाजार समितीमध्ये अधिकचा दर आहे याचा अभ्यास करुन शेतीमालाची विक्री करणे सहज शक्य होणार आहे.

गुगल प्ले स्टोअरवर MSAMB या नावाने अॅप

पणन मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेले अॅप हे गुगल प्ले स्टोअरमधून घ्यावे लागणार आहे. या करिता गुगल स्टोअरवर MSAMB असे शब्द टाकून डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर देण्यात आलेली माहिती अदा केल्यावर ते अॅपचे तुम्ही सदस्य असणार आहात. यामुळे शेतीमालाची दैनंदिन आवक-जावक, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची माहिती, शेतीमालाचा विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती एवढेच नाही तर कृषी पणन मंडळ राबवत असलेले विविध उपक्रम आणि योजनांची माहिती यार देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या हीताचे अॅप

काळाच्या ओघात होत असलेले बदल शेतकऱ्यांनीही स्वीकारणे गरजेचे आहे. अत्याधुनिक पध्दतीमुळे शेतकऱ्यांचे परिश्रम हे कमी होणार असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीजही होणार आहे. पणन मंडळाने तयार केलेले अॅप हे केवळ शेतीमालाचे दरच नाही तर बाजारसमितीमधील शेतीमालाची आवक, विक्रीदार तसेच कृषी पणन मंडळ राबवत असलेले उपक्रम याची माहिती देणारे आहे. त्यामुळे उत्पादनवाढीवर बरोबर अशा अत्याधुनिक पध्दतीचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अॅप उद्घाटन प्रसंगी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : हंगाम सुरु होताच तुरीची विक्रमी आवक, मोजमापसाठी दोन दिवसाचा कालावधी..!

कोरोना काळात शेती क्षेत्राचीच देशाला मिळाली साथ, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बळीराजा केंद्रस्थानी

Grape : द्राक्षाचे नुकसान आता बेदाणा निर्मितीच्याही वाढल्या अडचणी, काय आहेत समस्या ?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.