Papaya Farming : पपईच्या शेतीने बदललं भविष्य, दोन एकरातून १० लाख उत्पन्न

नीरज सिंह यांनी आपल्या बागेत रेड लेडी जातीची पपई लावली. ते म्हणतात, एका पपईपासून ते १०० किलो पपईचे उत्पादन घेतात. त्यांच्या पपईच्या प्लाटमध्ये १० महिलांना रोजगार मिळाला.

Papaya Farming : पपईच्या शेतीने बदललं भविष्य, दोन एकरातून १० लाख उत्पन्न
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 2:28 PM

नवी दिल्ली : पपई बाजारात वर्षभर मिळते. ४० ते ५० रुपये किलोने पपई विकली जाते. उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल, तामिलनाडू, हरियाणा आणि पंजाबसह इतर राज्यात पपईची लागवड करता येते. ही एकप्रकारची फळबाग लागवड आहे. कित्तेक राज्यात पपई लागवडीवर अनुदान दिले जाते. बिहारचे शेतकरी पपईची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. बिहारमध्ये हाजीपूर, दरभंगा, मधुबनी, सीतमढी आणि नालंदासह अन्य जिल्ह्यात पपईची शेती केली जाते. बेगुसराय जिल्ह्याची बातच न्यारी. येथील एका शेतकऱ्याने पपई लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे. चेरिया बरीयारपूर भागातील बढकुरवा येथे राहणारे शेतकरी नीरज सिंह पपईच्या शेतीतून वार्षिक सहा लाख रुपयांची कमाई करत आहेत.

अशी मिळाली प्रेरणा

नीरज सिंह यांना एका न्यूज चॅनलवरील कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली. पपईच्या शेतीसाठी राज्य सरकारकडून मोठी मदत झाली. कृषी विभागाकडून त्यांना रोप दिले गेले. एका पपईच्या झाडापासून साधारण ५० किलो पपईचे उत्पादन घेतात.

सहा लाख शुद्ध नफा

नीरज सिंह यांनी आपल्या बागेत रेड लेडी जातीची पपई लागवड केली. काही झाडांपासून १०० किलोपर्यंत उत्पादन घेतात. त्यांच्या बागेत १० महिला रोज काम करतात. अशाप्रकारे त्यांनी दहा लोकांना रोजगार दिला आहे.

रेड लेडी जातीची पपई लागवड दोन एकर जागेत करत आहेत. एका वर्षात पपई तयार होते. दरवर्षी ते दहा लाख रुपयांची पपई विक्री करतात. यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येतो. ६ लाख रुपये शुद्ध नफा मिळतो.

एकरी दोन लाख खर्च, तीन लाख शुद्ध नफा

नीरज सिंह म्हणतात, परंपरागत शेतीशिवाय ते फळबागेकडे वळले. विशेषतः पपईची शेती केली पाहिजे. कारण यात नफा जास्त मिळतो. तुम्ही एका एकर जागेत पपईची शेती करत असाल तर दोन लाख रुपये खर्च येईल. पण, तीन लाख रुपये शुद्ध नफा मिळतो. सरकारकडून एकरी ४५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बेगुसरायच्या दुसऱ्या शेतकऱ्यांनाही पपईची शेती करण्यासाठी चांगली संधी आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.