Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!

येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे नव्या प्रजातीच्या कासवाची. कासवप्रेमींसाठी ही एक वेगळी बाब असून ऑलिव्ह रिडले" आणि "ग्रीन टर्टल" चे संकरित गुणधर्म असलेली नव प्रजातीचे दर्शन घडून आले आहे. एकीकडे कासवाची संख्या घटत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. ऑलिव्ह रिडले" आणि "ग्रीन टर्टल" चे संकरित गुणधर्म असलेल्या या कासवांना वायंगणी नाव द्यावे अशी मागणी येथील कासवप्रेमींकडून होत आहे.

Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!
वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव प्रजातीचे कासव आढळून आले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:09 PM

सिंधुदुर्ग : येथील (Wayangani) वायंगणी (Beach) समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे नव्या प्रजातीच्या (Turtle) कासवाची. कासवप्रेमींसाठी ही एक वेगळी बाब असून ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” चे संकरित गुणधर्म असलेली नव प्रजातीचे दर्शन घडून आले आहे. एकीकडे कासवाची संख्या घटत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” चे संकरित गुणधर्म असलेल्या या कासवांना वायंगणी नाव द्यावे अशी मागणी येथील कासवप्रेमींकडून होत आहे.वेंगुर्ले, येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर “ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” या दोन्ही प्रजातींचे एकत्र जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळून आली आहे. कासवाच्या या जनुकीय बदलांमुळे एक नवी प्रजाती समोर येण्याची शक्यता आहे.

गावाच्या नावाचा आग्रह

सिंधुदुर्गातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या कासवाची प्रजाती आढळून आली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर या नव्या प्रजातीचा संशोधकांकडून अभ्यास व्हावा अशी मागणी सुहास तोरस्कर यांनी केली आहे. शिवाय गेल्या 20 वर्षापासून या किनाऱ्यावर कासवांचे संवर्धन व्हावे यासाठी ते काम करीत आहेत. या नव प्रजातीला समुद्रकिनारी असलेल्या वायंगणी या गावाचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे गावाला वेगळी ओळख निर्माण होणार आहे. 20 वर्षाची मेहनत आता कामी येऊ लागली असून कासवांचे संवर्धन केल्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे मेहनतीचे फळ आणि गावाला वेगळी ओळख याचा विचार करुन नाव देण्याची त्यांची मागणी आहे.

कासव संवर्धनासाठी संशोधन केंद्र उभारावे

काळाच्या ओघात कासवांची संख्या ही झपाट्याने घटत आहे. केवळ समुद्रकिनारी ते देखील कमी प्रमाणात कासव आढळून येतात. नवीन प्रजातीचे कासव हे ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या दोघांचे गुणधर्म असलेला नवीन प्रकारचे आहे. ही कोणती नवीन प्रजाती आहे याचे कुतुहूलही असल्याचे तोरस्कर यांनी सांगितले आहे. याचं संशोधन होऊन त्याला वायंगणी गावाचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केली. तसेच गावात कासवांचं संग्रहालय व्हावे, कासव संवर्धन केंद्र करावं आदी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

Water Council : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जल साक्षर पिढी घडवणे महत्वाचे, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मांडले केंद्राचे धोरण

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.