Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली
पीक संरक्षणासाठी आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणं याचे प्रयोग केलेले एकले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून याचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्यानं पीक संरक्षणासाठी असं काय जुगाड लावलं आहे की ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे पिकांचे संरक्षण तर होत आहे पण सध्याच्या कडक ऊनापासून त्या शेतकऱ्याचा बचावही होत आहे.
वाशिम : (Protection Cr0p) पीक संरक्षणासाठी आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणं याचे प्रयोग केलेले एकले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून याचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे (Washim) जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्यानं पीक संरक्षणासाठी असं काय जुगाड लावलं आहे की ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे पिकांचे संरक्षण तर होत आहे पण सध्याच्या (Summer) कडक ऊनापासून त्या शेतकऱ्याचा बचावही होत आहे. एका ठिकाणी सावलीत बसून चक्क दोन एकरातील पिकांचे संरक्षण ते सहज करु शकत आहेत. ढोणी गावचे गजानन शेळके यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. त्यामुळे पिकाची नासाडी तर टळलेली आहेच पण उत्पादनातही भर पडेल असा त्यांचा दावा आहे.
नेमकं काय केलं आहे गजानन शेळके शेतकऱ्याने?
ढोणी गावचे गजानन शेळके यांची हायब्रीड आणि ज्वारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी चक्क घरातील पाण्याच्या हंड्याचा वापर केला आहे. दोन एकरातील क्षेत्रामध्ये बांबूच्या सहायाने हांडे बांधले आहेत. या हंड्यामध्ये बारिक दगड,गोटे टाकून ते कापडाच्या सहाय्याने बंद केले आहे. एका एकरात किमान 4 ते 5 ठिकाणी असे करुन सर्व हांड्याचे दोर स्वत:कडे ठेऊन ते सातत्याने हालवत आहेत. त्यामुळे हांड्यातील दगड, गोटे यांचा गोंगाट होऊन पक्षीच काय जनावरे देखील पिकाकडे फरकत नाही. शिवाय एकाच जागेवरुन ते पिकाचे संरक्षण करु शकत आहेत. याकरिता काही खर्च नाही शिवाय एका ठिकाणी सावलीत बसून ते पिकांचे संरक्षण करु शकतात.
पीक बहरात, उत्पादन वाढीची आशा
रब्बी हंगामातील पीके यंदा बहरात आहेत. मध्यंतरीच्या अवकाळीचा अपवाद वगळता पिकांची वाढ जोमात झाली असून आता ज्वारी, हायब्रीड, हरभरा ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण तो पाण्याचा साठा होता म्हणून यशस्वी झाला आहे. खरीप हंगामात न भरुन निघणारे नुकसान झाले होते पण रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतील अशी आशा आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात नुकसान होऊ नये म्हणून अशा पध्दतीने पिकांचे संरक्षण केले जात आहे.
सकाळ-संध्याकाळ पक्षांकडून पिकांचे नुकसान
रब्बी हंगामातील ज्वारी, हायब्रीड, गहू ही पिके अंतिम असताना पक्षांकडून याला धोका असतो. शेत शिवारात सकाळ अन् संध्याकाळीच पक्षांचा चिवचिवाट असतो. याच दरम्यान पक्षांचे थवे येऊन थेट ज्वारीच्या कणसावर येऊन बसतात. त्यामुळे पिकांची नासाडी तर होतेच शिवाय उत्पादन घटीचाही धोका आहे. शेतकऱ्याच्या या अनोखा उपक्रमामुळे इतर शेतकरीही प्रभावित झाले आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : यंदाही सोयाबीनचे प्रमाणित बियाणेच नाही, कृषी विभागाचा काय आहे सल्ला?
Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले
Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले