Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी
शेती पध्दतीमध्ये बदल करायचा म्हणलं की, भौगोलिक स्थिती, वातावरणातील बदल आणि उत्पादनावर वाढत असलेला खर्च याचा विचार केला जातो. पण पक्का निर्धार आणि कष्ट करण्याची तयारी असल्यावर डोंगराळ भागातही द्राक्षाची बाग कशी बहरावी याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील राळेगाव येथील तरुण शेतकरी उमेश झाडे याने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.
यवतमाळ : शेती पध्दतीमध्ये बदल करायचा म्हणलं की, भौगोलिक स्थिती, वातावरणातील बदल आणि उत्पादनावर वाढत असलेला खर्च याचा विचार केला जातो. पण पक्का निर्धार आणि कष्ट करण्याची तयारी असल्यावर डोंगराळ भागातही द्राक्षाची बाग कशी बहरावी याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील राळेगाव येथील तरुण शेतकरी उमेश झाडे याने महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. (Dry Land) कोरडवाहू जमिन आणि प्रतिकूल वातावरणात (Grape Production) द्राक्ष लागवड केल्यावर अनेकांनी उमेशला हिनवले होते. मात्र, घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उमेशने रात्रीचा दिवस केला. आज वर्षाभराच्या कालावधीत अनेक संकटावर मात करुन त्याने उभारलेली बाग पाहून हिणवणाऱ्यांची बोटे तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत. राळेगावच्या शिवारात त्याने सव्वा एकरामध्ये ही (Vineyard) द्राक्षाची बाग बहली आहे. यंदा पहिले वर्ष असल्याने केलेला खर्च पदरी पडणार नाही पण आगामी काळात विक्रमी उत्पादन घेणार हा उमेशचा आत्मविश्वास सर्व शेतकऱ्यांसाठी प्ररेणादायी ठरणार आहे.
कशी झाली सुरवात?
उमेश राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील रहिवासी आहे.आठ एकर शेती अन् पारंपरिक शेतीतून कापूस व सोयाबीन पीक तो घेत होता. उत्पन्नाच्या तुलनेत बाजारपेठेत मालाला भाव मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत होती. तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी उमेश याने द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने पंढरपूर जवळील कासेगाव येथून कलमा आणल्या. 1 डिसेंम्बर 2020 ला सव्वा एकरात पंधराशे कलमांची 8 बाय 4 वर लागवड केली. तीन महिन्यानंतर त्याची रीकट केली. ड्रीपमधून खते व पाणीही देण्याचे नियोजन त्याने केले होते. योग्य नियोजनाला कष्टाची जोड मिळाल्याने ही बाग बहरली आहे.
कापूस पट्ट्यात बहरली द्राक्षाची बाग
जिल्ह्यात सर्वाधिक कापूस व सोयाबीन हे पारंपरिक पिके घेतल्या जाते.शिवाय पाण्याची सोय नसल्याने शेतकरी पारंपरिक पिकावरच भर देतात. वाढोनाबाजार येथील उमेश झाडे या युवा शेतकऱ्यांने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याप्रमाने द्राक्ष या फळ पिकाची लागवड केली आहे. यावर्षी पहिलेच वर्ष असून दीड एकरात द्राक्षाही लागले आहे. हा यवतमाळ जिल्यातील कोरडवाहू शेतीत त्याने यशस्वी अभिनव प्रयोग केला. यवतमाळ जिल्हा कापसासाठी जसा प्रसिद्घ आहे. तसाच तो नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणार्या आत्महत्यांनी काळवंडला आहे. या जिल्ह्यातील एका बहाद्दर शेतकर्याने पारंपरिक शेतीला फाटा देत चक्क नाशीकप्रमाणेच द्राक्षशेती फुलविली आहे.
पीक पध्दतीमध्ये बदल करण्याची हीच योग्य वेळ
एकट्या उमेशमुळे आता या परिसरातील शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे संत्रा मोसंबी आणि आता द्राक्ष ही या वातावरणात येत असल्याने या पिकाची लागवड करावी यातून कमी विक्रम मध्ये जास्त आर्थिक उत्पन्न या फळबागेतून मिळतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी द्राक्ष शेती व इतर फळबागांची लागवड करणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात बदलण्याची आणि शेती उत्पन्न वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर
Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!