बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई, या राज्यातून बियाणे येत असल्यामुळे…
तुरीच्या भावात वाढ, तर कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव वाढीच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी बी बियाणे, खते आणि औषध यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतमाल आणत आहेत.
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील बामडोद (bamdod) गावातील मंजुळाई नर्सरी येथून एक लाख ४३ हजार रुपयांचे कापसाचे बोगस बियाणे जप्त करण्यात कृषी विभागाच्या पथकाला यश आले आहे. कृषी विभागाने बोगस बियाणे (cotton Bogus seeds) तपासाण्यासाठी एक पथक तयार केलं आहे. या पथकाला गोपनीय माहिती मिळताच मंजुळाई नर्सरी तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आढळून आले. यासंदर्भात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्रीसाठी येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन बियाणांची खरेदी करणार आहेत.
या राज्यातून बियाणे येत असल्यामुळे…
झालेल्या कारवाईत गॅलेक्सी 5g चे दोन लॉटचे एकूण 102 पाकिटे होते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे येत आहेत. त्यामुळे पथक तयार करण्यात आले आहेत. परंतु या पथकाकडून पारदर्शक काम केलं, तर आणखीन मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे मिळण्याची शक्यता आहे. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन बोगस बियाणं संदर्भात गांभीर्याने घेत आहे. परंतू संबंधित भरारी पथकांकडून देखील पारदर्शक काम केलं पाहिजे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणखी बियाणं जप्त होण्याची शक्यता आहे.
बी बियाणे खते आणि औषध यांची खरेदी करण्यासाठी…
अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 17 ते 22 हजार पोत्यांची आवक होत असल्याची माहिती मिळाली आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीसाठी आणतं आहेत. तुरीच्या भावात वाढ, तर कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव वाढीच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी बी बियाणे, खते आणि औषध यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतमाल आणत आहेत.