Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसाचा भार 35 साखर कारखान्यांवर, ऊसतोडीसाठी कायपण?

मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात फडातील ऊसच वाळला नाही तरा तुरेही वाळले आहेत. यंदा साखर उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रातच अतिरिक्त ऊसाचाही प्रश्न भेडसावत आहे. गाळप हंगाम सुरु होऊन 7 महिने उलटले तरी ऊसाचे गाळप पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळेच साखर आयुक्तांनी आता आपले क्षेत्र न पाहता कारखाना लगतच्या क्षेत्रावरील ऊसतोड करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 35 साखर कारखान्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत ऊसतोडणीमध्ये स्पर्धा करणारे कारखाने आता एकमेकांच्या मदतीला धावून जाणार आहेत.

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसाचा भार 35 साखर कारखान्यांवर, ऊसतोडीसाठी कायपण?
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:54 PM

पुणे : मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात फडातील ऊसच वाळला नाही तरा तुरेही वाळले आहेत. यंदा (Sugar Production) साखर उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या (Maharashtra) महाराष्ट्रातच (Excess Sugarcane) अतिरिक्त ऊसाचाही प्रश्न भेडसावत आहे. गाळप हंगाम सुरु होऊन 7 महिने उलटले तरी ऊसाचे गाळप पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळेच साखर आयुक्तांनी आता आपले क्षेत्र न पाहता कारखाना लगतच्या क्षेत्रावरील ऊसतोड करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 35 साखर कारखान्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत ऊसतोडणीमध्ये स्पर्धा करणारे कारखाने आता एकमेकांच्या मदतीला धावून जाणार आहेत. मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसाची तोड व्हावी अशी मागणी उस्मानाबादचे आ. राणाजगतिजसिंह पाटील यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. आता हीच संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

नांदेड विभागातच वाढले सर्वाधिक क्षेत्र

मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र तसे कमीच होते. पण गेल्या दोन-तीन वर्षामध्ये पोषक वातावरणामुळे ऊसाच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. नांदेड विभागामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असल्याने उत्पन्नाच्या हिशोबाने क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात ऊसाचे क्षेत्र 90 हजार हेक्टराने वाढले आहे. यामध्ये नांदेड विभागात 43 हजार हेक्टराने वाढ झाली आहे. त्यामुळेच अतिरिक्त ऊसाचा प्रश्नही मराठवाड्यातच अधिक तीव्र झाला आहे. साखर आयुक्तांनी ऊसतोडीसाठी हा मधला मार्ग अवलंबला असून याची अंमलबजावणी झाली तर ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कोल्हापूर विभागातील प्रश्न मार्गी

कोल्हापूर विभागात ऊसाचे क्षेत्र अधिकचे असतानाही अतिरिक्त ऊसाची समस्या अद्यापर्यंत उद्भवलेली नाही. या विभागातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. एवढेच नाही तर सर्वाधिक उताराही याच विभागाने दिला आहे. ऊसाचे क्षेत्र वाढले तरी साखर कारखान्यांचे नियोजन, तोडीसाठी यंत्राचा वापर आणि वेळीच तोडीचे कार्यक्रम राबवल्याने ही समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळेच इतर साखर कारखाना क्षेत्रातील ऊसाची तोड करण्याची जबाबदारी ही कोल्हापुरातील कारखान्यांवरच येणार आहे.

असे होणार अतिरिक्त ऊस तोडीचे नियोजन

राज्यातील अतिरिक्त ऊसाचा अहवाल दर आठवड्याला साखर आयुक्त कार्यालयाला सादर केला जात आहे. त्यानुसार प्रादेशिक सहकारी संचालक, कारखान्यांचे शेतकी अधिकारी यांच्यामार्फत हे नियोजन केले जाणार आहेत. शिल्लक ऊसाची तोड करण्यासाठी विविध विभागातील 35 कारखाने हे स्वत:च्या ऊसाव्यतिरिक्त इतर कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस तोडणार आहेत. त्यामुळे ज्या कारखान्याकडून तोड त्याच कारखान्याकडूनच बीलही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Papaya : पपई दरावर तोडगा पण वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीचे काय? कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

Bhandara : ‘रोहयो’ चा उद्देश साध्य, भंडाऱ्यातील 85 हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम

Weather Report : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.