जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला. मान्सूनचे आगमन होत आहे. भारतातील ७५ टक्के लोकं शेतीवर जीवन जगतात. शेतकरी कामाला लागला आहे. देशात धानाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हमखास येणारे पीक अशी या धानाची ओळख. त्यामुळे कोणत्या जातीचे धान लावावे, यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. कोणी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, तर कोणी फळबाग लागवड करतात. परंतु, भारतात सर्वात जास्त धानाची लागवड होते. बिहार, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र तसेच बहुतेक सर्व राज्यांत धानाची शेती केली जाते. राज्या-राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे धान उगवले जातात.
जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं शेतकरी थेट पेरणी करू शकतात. यामुळे पाण्याच्या बचतीशिवाय चांगले उत्पादन होते. आईएआयआरचे निदेशक डॉ. अशोक कुमार श्रीवास्तव म्हणतात, शेतकरी पुसा बासमती १६९२, पुसा बासमती १५०९ आणि पुसा बासमती १८४७ ची शेती करू शकतात. यातून चांगले उत्पादन मिळेल.
बासमतीच्या या कमी वेळात तयार होणाऱ्या जाती आहेत. १२० ते १२५ दिवसांत धान तयार होतो. पुसा बासमती १६९२, पुसा बासमती १५०९ आणि बासमती १८४७ या रोग प्रतिबंधक जाती आहेत. यावर रोगांचा प्रभाव कमी होतो. यामुळे कीटकनाशकांवरील खर्च कमी करता येतो.
बासमतीच्या या तीनही जाती बहुदा १४५ दिवसांपूर्वी येतात. पुसा बासमती १८८६ चीही शेती केली जाऊ शकते. यात रोग प्रतिकारक क्षमता अधिक असते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. परंतु, पुसा बासमती १८८६ ही जाती परिपक्व होण्यासाठी १६० दिवस लागतात.