अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे.

अवकाळी पावासाने झोडपले, वीज पडल्याने नारळाचं झाडं पेटलं
coconut treeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 2:25 PM

नाशिक : सिन्नर (Sinner) तालुक्यातील कारवाडी (karwadi) वीज पडून नारळाचे झाड (coconut tree) पेटल्याची घटना घडली असून तालुक्याच्या पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसात सुरू झाली होती. दरम्यान शहा-कारवाडी रोडलगत राहणाऱ्या संतोष सोपानराव जाधव यांच्या घराजवळ असणाऱ्या नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या वरच्या भागाने पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. स्थानिक तरुणांनी तात्काळ औषध फवारणीचे प्रेशर ब्लोअरच्या साह्ययाने आग विझविली.

गत मार्च महिन्यात नांदेड जिल्ह्यात आवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, जिल्ह्यातील 35 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवला होता. या नुकसानीचे अनुदान नांदेडच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच अनुदान वाटप केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. शेतीच्या नुकसानीचे अनुदान इतक्या जलदगतीने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, हरभरा, बाजरी आणि मक्याची आवाज मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अवकाळी पावसाची वाढती भीती व वातावरणातील होणारे वारंवार बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्या दरामध्ये शेतमाल विकायला सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये आवक अचानक वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम दरांवर झाल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकांना मोठा फटका बसला होता. त्याचा परिणाम या पिकांवर झाल्याचही दिसून आले. अनेक शेतकऱ्यांचा कृषीमाल हा अवकाळी पावसामुळे डागाळला गेल्याने त्याला कमी किंमत मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम आटपल्यानंतर आता बागायतदार शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी मशागती करण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता, मात्र बागायतदार शेतकरी आता मागच्या सर्व सोडून नवीन पेरणीसाठी तयारी करताना दिसून येत आहे. शेतकरी मशागतीसाठी पारंपारिक पद्धतीने मशागती करण्यावर भर देताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणावर बागायतदार शेतकरी आहेत. यामुळे उन्हाळी पिकांसाठी शेतकरी आता मशागती करून पेरणीची तयारी करणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भरपाई वेळेवर मिळाले तर पेरणी करण्यासाठी पैसे येतील आणि पेरणी लवकर होणार आहे. त्यामुळे आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागून आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.