ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश

सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 3:53 PM

नवी दिल्ली : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. बिहारमध्ये विशेषता कृषी विद्यापीठे अतिशय चांगले काम करत आहेत. बटाटे हे बहुतेक कोणत्याही भाजीसोबत घालता येतात. बटाट्याचे बायप्रोडक्सही करता येतात. बटाटे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे जास्त काळ टिकणारा भाजीपाला म्हणून बटाट्याकडे पाहिले जाते. बिहारचे शेतकरी आता एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची शेती करतील. यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढेल. बिहार कृषी विद्यापीठात सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, एरोपोनिक शेती हे प्रगत शेतीचे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी माती आणि पाण्याची गरज पडत नाही. हवेत रोपटे उगवतात. रोपांची मुळे हवेत लटकतात. त्या माध्यमातून त्यांना पोषक तत्व मिळतात. या पद्धतीने बटाट्याचे उत्पादन १० पट वाढते.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना दिले जाईल प्रशिक्षण

संशोधन चमूचे मुख्य कृषी संशोधक डॉ. रणधीर कुमार यांचे म्हणणे आहे की, एरोपोनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आधीपेक्षा खूप जास्त होईल. शिवाय बटाट्याचे उत्पादन वाढेल. एरोपोनिक पद्धतीला सरकारची मान्यता मिळाली आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाईल. शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण राबवले जाईल.

चांगल्या दर्जाचे बटाटे उत्पादित होणार

सबौरचे कृषी संसोधक डॉ. रणधीर कुमार म्हणाले, एरोपोनिक पद्धतीने फक्त बटाटेच नाही, तर टमाटर, काकडी, स्ट्रॉबेरीसह अन्य कित्तेक जडी-बुटींची शेती केली जाऊ शकते. सध्या एरोपोनिक पद्धतीने बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहे. डॉ. रणधीर म्हणाले की, या पद्धतीने तयार केलेले बटाटे बीयाणे संक्रमणमुक्त राहतील. याचा अर्थ यावर होणाऱ्या आजाराचा परिणाम कमी होईल. यामुळे चांगल्या गुणवत्तेचे बटाटे तयार होतील.

या नवीन तंत्रज्ञानामुळे तांत्रिक पद्धतीने शिकून घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता असे छोटेमोठे व्यवसाय करून चांगले उत्पन्म मिळू शकते. शिवाय स्वतः निर्माण केल्याचा आनंद काही औरच असतो. आपण मालक असल्याचा रुबाब असतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.