शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : यंदाही सोयाबीनचे प्रमाणित बियाणेच नाही, कृषी विभागाचा काय आहे सल्ला?
राज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाळी सोयाबीन आहे असे नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बियाणांचा प्रश्न हा उपस्थित होणारच आहे. शिवाय खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बियाणे प्रमाणितच आहे असे नाही. यंदा खरिपासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा खुद्द कृषी विभागानेच केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय बाजारपेठेतील बियाणे हे प्रमाणित असेलच असे नाही.
वर्धा : राज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये (Summer Crop) उन्हाळी सोयाबीन आहे असे नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बियाणांचा प्रश्न हा उपस्थित होणारच आहे. शिवाय (Kharif Season) खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Soybean Seed) बियाणे प्रमाणितच आहे असे नाही. यंदा खरिपासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा खुद्द कृषी विभागानेच केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय बाजारपेठेतील बियाणे हे प्रमाणित असेलच असे नाही. त्यामुळे या बियाणाच्या वापरामुळे उत्पादनात घट येऊ शकते. याबाबत कृषी विभागाकडून आतापासून जनजागृती केली जात आहे. उन्हाळी हंगामात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पेरा केला आहे त्यांनी देखील हे बियाणे प्रमाणित करुनच वापरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
उन्हाळी सोयाबीनवरही कीड-रोगराईचा प्रादुर्भाव
उन्हाळी हंगामातील सर्वच भागातील पीक बहरात असे नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम या पिकावरही झाला आहे. अवकाळी आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन बियाणासाठी वापरणे धोक्याचे होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. रब्बी हंगामात सोयाबीनचा पेरा करण्यासाठी खरिपातील सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्री केले आहे. खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
अशी घ्या बियाणाची काळजी
बियाणांची योग्य काळजी घेतली तरच ते प्रमाणित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणाची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी ही सातपेक्षा अधिक असू नये. शिवाय याची साठवणूक ही कोरड्या जागेत करावी लागणार आहे. एवढेच नाही तर साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर लाकडी फळ्या किंवा पुट्टे अंथरुन त्यावर बियाणे साठवावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणांची तीन वेळा उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
अवकाळीमुळे दोन्ही हंगामात नुकसान
अवकाळीमुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असे नाही तर उन्हाळी हंगामातील सोयाबीनवरही याचा परिणाम झाला आहे. पेरणी होताच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच पण कीड-रोगराईमुळे हे सोयाबीन आता बियाणे म्हणून वापरता येणार नाही. खरिपात उत्पादनात घट झाली तर रब्बी हंगामात योग्य तो वापर करता येणार नाही.
संबंधित बातम्या :
Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले
‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री केल्यास जेलची हवा, पणन संचालकाचे काय आहेत निर्देश?
Kisan Credit Card : कार्डमुळे वाढणार शेतकऱ्यांचे Credit, कार्ड नेमके मिळवायचे कसे ? घ्या जाणून