Kharif Season : यंदाच्या हंगामात घरच्या सोयाबीन बियाणांवरच भर, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय?

पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही आणि उगवले तरी शेंगा लागल्याच नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण संपूर्ण हंगाम वाया जातो. सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट हे यशस्वी होतीलच असे नाही. शिवाय यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याने बाजारपेठेतील बियाणे पुरेल का नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Kharif Season : यंदाच्या हंगामात घरच्या सोयाबीन बियाणांवरच भर, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला काय?
बियाणे
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 9:40 AM

औरंगाबाद : उत्पादन आणि उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून (Kharif Season) खरीप हंगामच महत्वाचा आहे. उत्पादनावर खर्च कमी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागाचीही महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी (Soybean Seeds) बाजारपेठेतील विकतचे बियाणे घेण्यापेक्षा घरगुती बियांणावरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. यामुळे खर्च कमी आणि (Production Increase) उत्पादन अधिक अशी परस्थिती निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुन बियाणांचा वापर करणेही तेवढेच महत्वाचे आहे. खरीप हंगामात एक ना अनेक पर्याय अवलंबून उत्पादन वाढीचा प्रयत्न राहणार आहे.

विकतच्या बियाणांच्या तक्रारी अधिक

पेरणीनंतर सोयाबीन उगवलेच नाही आणि उगवले तरी शेंगा लागल्याच नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण संपूर्ण हंगाम वाया जातो. सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट हे यशस्वी होतीलच असे नाही. शिवाय यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याने बाजारपेठेतील बियाणे पुरेल का नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून आतापासूनच सुक्ष्म नियोजन केले तरच उत्पादनात वाढ आणि खर्चात कमी होणार आहे.

घरच्या घरी अशी करा बीजप्रक्रिया

पेरणीच्या आगोदर सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजेत बीजप्रक्रिया. शेतात सोयाबीन उभे असताना भेसळ काढणे तसेच कीड व रोगग्रस्त झाडे काढूण टाकणे महत्वाचे आहे. काढणी पश्चातही उगवण टिकवून ठेवण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी लागणार आहे.सोयाबीन वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थर करावे लागणार आहेत. शिवाय मळणी करताना 13 ते 14 आर्द्रता असू नये. मळणीनंतर पोत्यात भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जाऊ द्यावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वर्ष बियाणे बदलण्याची गरज नाही

दरवर्षी बियाणे बदलावे असे काहीच नाही. एकदा वापरलेले बियाणे हे पुढील वर्षी देखील वापरता येणार आहे. दरवर्षी नवीन बियाणे वापरल्याने खर्चात वाढ होते पण उत्पादनाची हमी नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची हमी नाही. शिवाय यामुळे खर्चात वाढ झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विकतच्या बियाणांपेक्षा घरच्या बियाणांवरच भर देणे गरजेचे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.