Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा ‘आधार’?

बाजारपेठेतील दर घसरले तरी किमान आधारभूत किंमतीने धान्याची विक्री करता यावी म्हणून नाफेडच्या माध्यमातून सरकार शेतीमालाची खरेदी करीत असते. सध्या तूर आणि हरभऱ्याच्या खरेदीसाठी असे केंद्र उभारण्यात आली आहेत. कृषी विभागाने जाहीर केलेल्या द्वितीय आगाऊ अंदाजामुळे हरभऱ्याच्या उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी शक्य आहे.

Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा 'आधार'?
कृषी विभागाच्यावतीने उत्पादकता जाहीर करण्यात आली असून त्यानुसार आता हरभऱ्याची खरेदी होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 5:10 AM

लातूर : बाजारपेठेतील दर घसरले तरी किमान (Base Price) आधारभूत किंमतीने धान्याची विक्री करता यावी म्हणून नाफेडच्या माध्यमातून सरकार शेतीमालाची खरेदी करीत असते. सध्या तूर आणि (Chickpea Crop) हरभऱ्याच्या खरेदीसाठी असे केंद्र उभारण्यात आली आहेत. (Agricultural Department) कृषी विभागाने जाहीर केलेल्या द्वितीय आगाऊ अंदाजामुळे हरभऱ्याच्या उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी शक्य आहे. उत्पादन क्षेत्र वाढूनही आता शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा आधार घेता येणार आहे. सध्या हमीभावापेक्षा बाजारपेठेतील दर हे कमी आहेत. त्यामुळे या केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, त्यापुर्वी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर पिकाची नोंदणी करणे गरजेचे आहे.

6 लाख 89 हजार टन हरभऱ्याची खरेदी करण्याचे उद्दीष्ट

यंदा हरभऱ्याचे क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हरभरा खरेदीचे नियोजन कसे केले जाणार हा मोठा प्रश्न होता. अखेर कृषी विभागाने उत्पादकतेमुळे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी करावे असे आदेश पणन महासंघाने दिले आहेत. खरेदी केंद्राच्या माध्यातून राज्यातील 6 लाख 89 हजार टन हरभऱ्याची खरेदी करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये ही खरेदी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. शिवाय नोंदणीनंतर आता 1 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली आहे.

खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये क्विंटल दर

नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेत सध्या 4 हजार 200 ते 4 हजार 4 हजार 700 असा दर आहे. त्यामुळे खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना चांगला आधार मिळणार आहे. दरातील तफावत शिवाय उद्या आवक वाढली तर पुन्हा घसरण ही झालीच असती त्यामुळे यंदाचा हरभऱ्याचा हमीभाव शेतकऱ्यांना तारेल असे चित्र आहे. पण त्यापूर्वी करावी लागणारी नोंदणी ही प्रक्रिया महत्वाची आहे.

अशी आहे राज्यातील हरभऱ्याची अंदाजित उत्पादकता

दरवर्षी पीक कापणीपूर्वी कृषी विभागाकडून उत्पादकता ठरवली जाते. त्यानुसार पीकाचे नियोजन केले जाते. उत्पादकता ही क्विंटलमध्येच मोजली जाते. यामध्ये परभणी : 8.20, हिंगोली :11.00, नांदेड : 11.50, लातूर : 13.50, उस्मानाबाद: 6.5, बीड: 9.5, जालना:13.00, औरंगाबाद: 5.80, बुलडाणा: 11.80, अकोला : 15.00, वाशिम : 7.00, यवतमाळ: 12.00, अमरावती: 15.60, नागपूर : 15.00, भंडारा: 8.00, गोंदिया: 8.10, चंद्रपूर: 7.50, गडचिरोली 4.7, नाशिक: 9.50, धुळे 10.97, नंदूरबार: 13.96, जळगाव: 13.00, नगर: 7.5, पुणे : 8.60, सोलापूर:6.50, सातारा : 9.25, सांगली: 11.6, कोल्हापूर : 12.00, ठाणे 7.10, पालघर:7.50, रायगड: 4.50 तर रत्नागिरी 4.90 अशी उत्पादकता आहे.

संबंधित बातम्या :

उत्सुकता शिघेला, दोन दिवस बाजार समित्या बंद नंतर सोयाबीन दराचे चित्र काय? तज्ञांचे शेतकऱ्यांना सल्ला

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार

ठरलं तर मग, व्यापारी अन् शेतकऱ्यांच्या बैठकीत पपई दराचा निर्णय, टिकणार की मोडणार..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.