Nagpur: कृषी विभागाचे ‘मिशन’ खरीप हंगाम, शेतकऱ्यांच्या एका तक्रारीवर लागणार प्रश्न मार्गी..!

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. एवढेच नाही तर काही भागांमध्ये पावसाने हजेरीही लावली आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. यंदा बियाणे आणि खताच्या किंमती वाढल्या असल्या तरी सध्याचे पोषक वातावरण आणि भविष्यातील उत्पादनाची आशा यामुळे खरेदीवर भर दिला जात आहे.

Nagpur: कृषी विभागाचे 'मिशन' खरीप हंगाम, शेतकऱ्यांच्या एका तक्रारीवर लागणार प्रश्न मार्गी..!
खरीप हंगाम
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:25 AM

नागपूर :  (Kharif Season) खरीप हंगामावर निसर्गाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे या हंगामातील उत्पादन हे अनिश्चित मानले जाते. मात्र, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करुन हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्याचा निर्धार (Agricultural Department) कृषी विभागाने केला आहे. प्रशासनाकडून योग्य असे नियोजन केले जात असले तरी स्थानिक पातळीवर खत-बियाणे खरेदी करण्यापासून ते पेरणीपर्यंत एक ना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यंदा (Nagpur Division) नागपूर विभागात तब्बल 60 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे भरारी पथक राहणार असून मंडळाच्या ठिकाणी असणाऱ्या कृषी सेवा केंद्रावरही या भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना अडचण आल्यास केवळ एका तक्रारीवर प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

खत-बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. एवढेच नाही तर काही भागांमध्ये पावसाने हजेरीही लावली आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. यंदा बियाणे आणि खताच्या किंमती वाढल्या असल्या तरी सध्याचे पोषक वातावरण आणि भविष्यातील उत्पादनाची आशा यामुळे खरेदीवर भर दिला जात आहे. नागपूर विभागात बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला तरी खताबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अवैध विक्री होऊ नये म्हणून तालुकानिहाय भरारी पथक नेमण्यात आले आहे.अनियमितता आढळून आल्यास निलंबनाच्या कारावाईपर्यंतचे अधिकार पथकातील अधिकाऱ्यांना राहणार आहेत.

नागपूर विभागाचे असे आहे चित्र

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 23 लाख 12 हजार हेक्टर खरीप पेरणीचं क्षेत्र आहे. मॅान्सूनची चाहूल लागल्यानंतर शेतकऱ्यांची बियाणं आणि खतं खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. नागपूर विभागात कृषी विभागाने 60 पेक्षा तास्त भरारी पथकं गठित केलीय. विदर्भात 11 ते 11 जूनपर्यंत मॅान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुरेसा पाऊस झाला की पेरणीही सुरु होणार आहे. खरिपात शेतकऱ्यांची फसवणुक होऊ नये म्हणून कृषी विभागाचं मिशन खरिप सुरु झालंय. यंदा पोषक वातावरणाचा परिणाम उत्पादनावर व्हावा असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

एका तक्रारीत सुटणार शेतकऱ्यांची अडचण

खरीप हंगामात पेरणी योग्य पाऊस झाला की वेळेत चाढ्यावर मूठ ठेवणे गरजेचे असते. शेतकऱ्यांकडून बी-बियाणांची मागणी होताच बाजारपेठेत कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. त्यामुळे अधिकच्या दराने खताची खरेदी तर करावी लागते शिवाय ते वेळेत मिळत नसल्याने संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे बाजारपेठेत असा काही प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अक्षीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागपूर विभागाचे कृषी उपसंचालक रविंद्र भोसले यांनी केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.