Agricultural : ठरलं तर मग, खरिपातील नुकसानभरपाईबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे वक्तव्य..!

कृषी खात्याचा पदभार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे प्रथमच विदर्भात दाखल झाले आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा याच विभागात झाला असून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भरपाईबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. जिरायतील हेक्टरी 13 हजार 600 अशी रक्कम ठरवण्यात आली आहे. मात्र, त्यानुसार मदत मिळणार आहे.

Agricultural : ठरलं तर मग, खरिपातील नुकसानभरपाईबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे वक्तव्य..!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:27 PM

नागपूर:  (Heavy Rain) अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. जुलै अन् ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 15 लाख हेक्टराहून अधिकच्या क्षेत्रावरील (Crop Damage) पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करावी अशी मागणी विधीमंडळात विरोधकांनी केली आहे. मात्र, ओल्या दुष्काळासारखी स्थिती नाही. शिवाय त्यासाठी वेगळे नियमही असतात असे (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. पण नुकसानभरापाईबाबत आता सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. शिवाय दोन दिवसांमध्ये राज्यातील पीकांची पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मदत रकमेची वाटप नेमकी केव्हापासून सुरु होणार याबाबत मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री म्हणून मी सोमवारी सभागृहात घोषणा करणार असल्याचे सत्तार यांनी नागपुरात सांगितले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळेल असे चित्र आहे.

कृषीमंत्री सत्तार विदर्भाच्या दौऱ्यावर

कृषी खात्याचा पदभार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे प्रथमच विदर्भात दाखल झाले आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा याच विभागात झाला असून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भरपाईबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. जिरायतील हेक्टरी 13 हजार 600 अशी रक्कम ठरवण्यात आली आहे. मात्र, त्यानुसार मदत मिळणार आहे. मदत निधीपूर्वी कृषी मंत्री हे पीक पाहणीसाठी विदर्भात दाखल झाले आहेत सत्तार हे नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सभागृहात होणार प्रत्यक्ष मदत रक्कम वाटपाची घोषणा

गेल्या अनेक दीड महिन्यापासून राज्यात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण फळबागाही आडव्याच आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीक करावा या मागणीसाठी विरोधक हे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत सोमवारी घोषणा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पीक नुकसानाची पाहणी

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत विरोधक आणि प्रशासनाकडूनही पीक पाहणी झालेली आहे. आता प्रत्यक्ष नुकासानभरपाई अदा करण्याच्या प्रसंगीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक पाहणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. शिवाय या पाहणीनंतर भरपाईबाबत काय निर्णय़ होणार का हे देखील पहावे लागणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.