Soybean Crop : सोयाबीन उत्पादनवाढीसाठी असा हा ‘वाशिम पॅटर्न’, आवाहन नव्हे तर बांधावर शिबिरांचे आयोजन
उत्पादनवाढीची खरी प्रक्रिया ही पेरणीपासूनच सुरु होते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. पेरणीत गणित हुकले तर उगवणीचे काय असा प्रश्न निर्माण होत असल्याने उत्पादनात घट होते. मात्र, कृषी विभागाने 1 एप्रिलपासूनच बीजसंस्करणाच्या मोहिमेला सुरवात केली होती. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 700 गावामधील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.
वाशिम : यंदा (Kharif Season) खरीप हंगामातील पेरण्यांना उशीर होत असला तरी उत्पादनवाढीसाठी सर्वकाही केले जात आहे. विशेषत: यामध्ये (Agricultural Department) कृषी विभागाचे मोठे योगदान राहणार आहे. पेरण्या रखडल्याने संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती, समुपदेशनाची. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये हिच भूमिका निभावत आहे वाशिमचा कृषी विभाग. राज्यात (Soybean Crop) सोयाबीनचे हब म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे उत्पादनवाढीची परंपरा यंदाही कृषी विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. केवळ आवाहनच नाहीतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही धीर मिळत असून पाऊस दाखल झाल्यानंतर काय करायचे हे आता स्पष्ट झाले आहे.
700 गावांमध्ये बीजसंस्कारणाची मोहिम
उत्पादनवाढीची खरी प्रक्रिया ही पेरणीपासूनच सुरु होते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. पेरणीत गणित हुकले तर उगवणीचे काय असा प्रश्न निर्माण होत असल्याने उत्पादनात घट होते. मात्र, कृषी विभागाने 1 एप्रिलपासूनच बीजसंस्करणाच्या मोहिमेला सुरवात केली होती. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 700 गावामधील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पेरणीला उशीर झाला तरी कोणती प्रणाली राबवायची याची माहिती शेतकऱ्यांनाच झाली आहे.
शिबिरे आणि बचत गटांतून मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या अर्थकारणाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा आहे. शिवाय वाशिममध्ये जवळपास 4 लाखाहून अधिक हेक्टरावर सोयाबीनचा पेरा केला जातो. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कृषी विभागातील उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. गावस्तरावर शेतकरी बचत गटातील सदस्यांना मार्गदर्शन आणि शेत शिवारात शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
नेमकी बीजप्रक्रिया कशी केली जाते ?
बीजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.