पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बी हंगामासाठी तरी परवानगी द्यावी, दादा भुसेंची मागणी

मध्यप्रदेश प्रमाणे केंद्राने महाराष्ट्रातही बीड पॅटर्न राबवायला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकार याबाबत उदासीन असल्याचं, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बी हंगामासाठी तरी परवानगी द्यावी, दादा भुसेंची मागणी
दादाजी भुसे
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 7:07 PM

पुणे: महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुणे येथे रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मध्यप्रदेश प्रमाणे केंद्राने महाराष्ट्रातही बीड पॅटर्न राबवायला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकार याबाबत उदासीन असल्याचं, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रब्बी हंगामासाठी पीक विमा राबवताना बीड पॅटर्न राबवायला परवानगी द्यावी, अशी विनंती केल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं.

रब्बी हंगामासाठी बीड पॅटर्न राबवण्यास मंजुरी द्या

पीक विमा कंपन्यांनी 10 टक्केपेक्षा जास्त नफा घ्यायचा नाही,10 टक्के प्रशासकीय खर्च आणि ऊर्वरित रक्कम सरकारजमा करायची असा बीड पॅटर्न आहे. याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे संपूर्ण राज्यात बीड पॅटर्न राबवावा अशी केंद्राला विनंती केली मात्र, केंद्राने त्याला नकार दिलाय. या रब्बी हंगामात तरी राज्यात बीड पॅटर्न राबवायला परवानगी देण्याची विनंती केल्याचं भुसे म्हणालेत.दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कृषी आयुक्तालयात रब्बी हंगामाची नियोजन बैठक पार पडली. या हंगामात राज्यात 60 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितलं.

बीड पॅटर्न नेमका काय?

शेतकरी बांधवांनी पीक विमा काढल्यानंतर त्यामध्ये 1.5 टक्के ते 2 टक्के हिस्सा शेतकरी भरतो. जर 100 कोटी प्रीमियम शेतकऱ्यांना भराव लागलं. 50 कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावे लागले. उर्वरित 50 कोटीमध्ये कंपनीचा नफा अधिक प्रशासकीय खर्च धरुन 20 कोटी कंपनीला राहतील. उर्वरित 30 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरण्यासाठी कंपनीनं राज्य सरकारला द्यावेत. या उलट ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येईल त्यावेळी 100 कोटी प्रीमियम मिळालेल्या कंपनीला 150 कोटी खर्च करायचे असतील त्यावेळी कंपनीनं 110 कोटी द्यावेत राज्य सरकार वरचे 40 कोटी रुपये कंपन्यांना देईल. हा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

पीक विम्याचा बीड पॅटर्न राज्यात राबवण्याची गरज का?

पीक विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचं समोरं आलं आहे. गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी, राज्य सरकारचा वाटा, केंद्र सरकारचा वाटा म्हणू 5 हजार कोटीचा प्रीमियम भरला गेला. मात्र, शेतकऱ्यांना केवळ एक हजार कोटी रुपये विमा परतावा मिळाले. या सर्व प्रकारात विमा कंपन्यांना होणाऱ्या नफ्यावर मर्यादा आणून तो शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरण्याचा मानस असल्याचं दादाजी भुसे म्हणाले. पीक विमा कंपन्यांनाच्या नफ्यावर बंधन आणण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्याची माहिती दादाजी भुसे यांनी दिली.

शेतकऱ्यांचा विरोध

एककीडे राज्य सरकार पीक विम्याच्या बीड पॅटर्नसाठी आग्रही आहे तर पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. बीड -परळी रसत्यावर घाटसावळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय.

इतर बातम्या:

पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवा, राज्याची केंद्राकडे मागणी, बीड पॅटर्न नेमका काय?

बीड पॅटर्नसाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना साकडं, स्वाभिमानीचं बीड पॅटर्न विरोधात बोंब मारो आंदोलन

Agriculture Minister Dada Bhuse said Union Government not ready to approve Beed Pattern of Crop Insurance for all Maharashtra

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....