नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मधुक्रांती पोर्टलचं लॉचिंग केले आहे. केंद्र सरकारच्या या पोर्टलचा फायदा मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. नरेंद्रसिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्टलचं उद्घाटन केले. राष्ट्रीय मधमाशी आणि मध उत्पादन मिशनचं सुरुवात करण्यात आली आहे. (Agriculture Minister Narendra Singh Tomar inaugurates madhukranti portal for honey producer farmers)
मधुमक्षिका पालन आणि मध उत्पादक शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. मधनिर्मिती प्रक्रियेशी निगडीत व्यक्तींची माहिती भरावी लागणार आहे. यासह मध खरेदी आणि विक्री बाबत माहिती नोंदवावी लागेल. केंद्र सरकार पोर्टलवरील उपलब्ध माहितीचा अभ्यास करुन मध उत्पादकांना दिलासा देणार आहे. केंद्र सरकारनं मध उत्पादनाकडे विशेष लक्ष दिलं आहे. मार्च महिन्यातील मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मधनिर्मितीबाबत चर्चा केली होती.
जगातील सर्वात जास्त मधनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो. 2019-20 मध्ये भारतात 1 लाख 20 हजार टन मध निर्मिती झाली होती. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मध उत्पादक शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच राज्यांमध्ये 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. याद्वारे मधउत्पादनावर विशेष भर दिला जाणार आहे.
नवी दिल्लीत मध विक्रीसाठी शोरुम
मध उत्पादनांच्या विक्रीसाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये 15 शोरुम स्थापन करण्यात आली आहेत. या शोरुममध्ये ग्राहकांना उच्च प्रतीचा मध उपलब्ध होतो. देशभरात मध विक्री केंद्र वाढवण्याचा विचार केला जात आहे.
भारतातून किती निर्यात होते?
राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्डाच्या अहवालानुसार भारतात 9580 नोंदणीकृत शेतकरी आणि संस्थाद्वारे मधुमक्षिका पालन केले जाते. भारतानं 2019-20 मध्ये 59 हजार 536 मेट्रिक टन मध निर्यात केला. त्याद्वारे 633.82 कोटी रुपये भारताला मिळाले. तर 2018-19 मध्ये मधनिर्यातीतून 732.16 कोटी रुपये मिळाले होते.
मुंबईत आहात आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली, काय करायचं? ‘या’ नंबर संपर्क कराhttps://t.co/lsvhTiUCT8 #Mumbai #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2021
संबंधित बातम्या:
PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहोचणार 2000 रुपयांचा आठवा हप्ता? सरकारने दिले उत्तर
(Agriculture Minister Narendra Singh Tomar inaugurates madhukranti portal for honey producer farmers)