अनिल केऱ्हाळे, जळगाव : मागच्या आठवडाभरात राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचं (Farmer)मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत असल्याचं समजतंय. द्राक्षांच्या बागा आणि हातातोंडाशी आलेलं रबी पिकाचं नुकसान झाल्यामुळे घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं (jalgaon farmer news) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर वरील पिके आडवी झाली आहेत, मात्र अद्यापही शासनाच्या एकही प्रतिनिधी बांधावर फिरकला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आता तोंडाशी आलेला घाट फिरवला गेल्याने कर्जाचे हप्ते व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत शेतकरी वर्ग आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीचे पंचनामे आदेश देण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र नुकसान होऊन दोन ते तीन दिवस उलटूनही अद्यापही पंचनामे झाले नसून पंचनामे दूरच मात्र शासनाच्या एकाही प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधाकडे फिरकला नाही.
एकीकडे पिकाला भाव नसताना हाता तोंडाशी आलेला घास फिरवला गेल्याने बळीराजासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह बँकेच्या कर्जाचा डोंगर हा उभा आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे. अनेक फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.