Jalgaon : शेतकऱ्यांचा कापूस घरातच ; किती महिने वाट पाहणार ? शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत
जळगावातील शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या मालाला चांगला दर मिळावा म्हणून वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी कापसाची आवक वाढली. त्यावेळी कापसाचा दर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणलेला नाही.
जळगाव : कापसाचे दर वाढतील , ही अपेक्षा ठेवून यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmer) आपला माल अद्याप विक्रीसाठी आणलेला नाही. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात १० लाख गाठींपर्यंत कापसाची (kapus) खरेदी दरवर्षी होते. मात्र, यंदा केवळ 4 लाख गाठींपर्यंत कापसाची आवक झाली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला . ते अजूनही चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत आहेत . गेल्या वर्षी कापसाचे दर 10 ते 11 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र , बाजारात (jalgaon market) नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर मुहूर्ताचा दर मोठ्या प्रमाणात देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात आवक सुरू झाल्यानंतर घट झाली कापसाच्या दरात कापसाच्या दरात वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणलेलाच नाही.