Pune : विहिरीवरील कृषी पंप थेट भंगारात, कृषी पंपाची चोरी करणारी टोळी गजाआड

कृषी पंप चोरीचे कनेक्शन आमदाबाद ते थेट नाशिपर्यंत पोहचले होते. या टोळीतील आरोपी अख्तर उर्फ कुल हुसेन खान याचे अहमदाबाद फाटा शिरुर येथे भंगाराचे दुकान होते. परिसरातील कृषी पंपाची चोरी करायची आणि ते थेट भंगारात मिळेल त्या किंमतीमध्ये विकारयचे असा धंदाच आरोपींनी सुरु केला होता. मात्र, एकाच रात्रीतून 8 कृषी पंप चोरीला गेल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि सापळा रचून या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

Pune :  विहिरीवरील कृषी पंप थेट भंगारात, कृषी पंपाची चोरी करणारी टोळी गजाआड
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कृषीपंप चोरी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:27 AM

पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तोट्यात आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या आता कुठे पेरणी पू्र्ण झाली असताना अधिकच्या पावसामुळे पिके पाण्यात आहेत. शेतकरी अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असताना (Shirur Police) शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील शेतकरी मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त होते. येथील शेत शिवारात (Agricultural Pump) कृषी पंप चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. कहर म्हणजे एकाच रात्रीतून 8 कृषी पंप हे (Theft of agricultural pump) चोरीला गेले होते. अखेर या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिरुर पोलीस ठाण्याच्या कर्माचाऱ्यांनी सापळा रचून या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपासानंतर त्यांच्याकडून 17 कृषी पंप ताब्यात घेण्यात आले आहेत.

विहिरींवरील कृषी पंप थेट भंगारात

कृषी पंप चोरीचे कनेक्शन आमदाबाद ते थेट नाशिपर्यंत पोहचले होते. या टोळीतील आरोपी अख्तर उर्फ कुल हुसेन खान याचे अहमदाबाद फाटा शिरुर येथे भंगाराचे दुकान होते. परिसरातील कृषी पंपाची चोरी करायची आणि ते थेट भंगारात मिळेल त्या किंमतीमध्ये विकारयचे असा धंदाच आरोपींनी सुरु केला होता. मात्र, एकाच रात्रीतून 8 कृषी पंप चोरीला गेल्याने पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि सापळा रचून या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. आतापर्यंत 17 कृषीपंपाची चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले असले तरी यामध्ये आणखी काही उघडकीस होणार याचा तपास पोलिस घेत आहेत.

आमदाबाद ते नाशिक कनेक्शन

आमदाबाद गाव शिवारातच कृषी पंपाच्या चोरीच्या घटना वाढत होत्या. त्यानुसार स्थानिकाच्या मदतीनेच ह्या चोरीच्या घटना होत असल्याचा संशय पोलिसांना होता. तर आरोपीमधील अख्तर उर्फ कुल हुसेन खान (27) याचे अहमदाबाद फाटा शिरूर येथे भंगाराचा व्यवसाय होता. कृषी पंपाची चोरी करायची आणि भंगारात विक्री असा गोरख धंदाच त्याने सुरु केला होता. यामध्ये पांडुरग शिवाजी बोडरे वय (20) वर्षे रा. रावडेवाडी ता. शिरूर, कुलदिप उर्फ मोन्या बबन बोडरे वय (20) तर अजर हुसेन खान वय (22) दोघेही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवाशी होते. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी पंपासह इतर साहित्यही जप्त

कृषी पंपाच्या चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि तब्बल 17 कृषी पंप हे शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा करण्यासाठी वापरत असलेली एक मोटार सायकल व एक छोटा हत्ती असा माल हस्तगत करण्यात आलेला असुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरील घटनांमुळे शेतकरी चिंतेत होते पंपच चोरीला गेल्याने शेताला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्याला पडत होता वेळोवेळी तक्रार करण्यात आल्या. एवढेच नाही तर यासाठी आंदोलन ही शेतकऱ्यांनी केली होती तरीही कृषी पंपाच्या चोऱ्या रोखणं पोलिसांना समोर एक आव्हान निर्माण झाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.