Ajit Pawar: लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम-अटी बाजूला ठेवा अन् मदत करा, अजित दादांनी शेतकऱ्यांनाही सांगितला मार्ग..!

पीक पाहणी, पंचनामे यांची औपचारिकता न करता नुकसानीची दाहकता लक्षात घेता सरसकट मदत मिळणे गरजेचे आहे. शिवाय वेळेपूर्वी पंचनामे झाले तरच नुकसानीचे चित्र समोर येणार आहे. पंचनाम्यास उशिर झाल्यावर त्या प्रक्रियेचा तरी काय उपयोग असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनाचे 5 एक्करपर्यंतचे क्षेत्र त्यांनाच मदत असा नियम आहे.

Ajit Pawar: लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम-अटी बाजूला ठेवा अन् मदत करा, अजित दादांनी शेतकऱ्यांनाही सांगितला मार्ग..!
विरोधी पक्षनेते अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:41 AM

वर्धा :  (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपातील सर्व पिके ही पाण्यात आहेत. अशा परस्थितीमध्ये (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भातील पिकांची पाहणी करीत आहे. (State Government) सरकारकडून अधिकची मदत रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याासाठी आणि बांधावरची स्थिती काय आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. एवढेच नाहीतर वेळप्रसंगी नियम-अटी बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. शेत शिवरातले चित्र हे विदारक आहे. त्यामुळे नियमित वेळेत पंचनामे झाले तरच नुकसानीची दाहकता लक्षात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंचनामे आणि मदत ही त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला..!

पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या मात्र, अधिकच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत कमी कालावधी उत्पादन पदरी पड़ेल असेही बियाणे असते. त्यामुळे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पहिल्या पेऱ्यातील पिकांचे नुकसान झाले असल्याने आता अधिकचा वेळ आणि पैसा खर्चून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

नियम-अटींचा अडथळा, सरसकट मदत गरजेची

पीक पाहणी, पंचनामे यांची औपचारिकता न करता नुकसानीची दाहकता लक्षात घेता सरसकट मदत मिळणे गरजेचे आहे. शिवाय वेळेपूर्वी पंचनामे झाले तरच नुकसानीचे चित्र समोर येणार आहे. पंचनाम्यास उशिर झाल्यावर त्या प्रक्रियेचा तरी काय उपयोग असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनाचे 5 एक्करपर्यंतचे क्षेत्र त्यांनाच मदत असा नियम आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडे क्षेत्र हे अधिकचे असते त्यामुळे कोणतेही नियम न लावता सरसकट मदत गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्री मंडळाचा विस्तार न झाल्याने अडचणी

सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. असे असतानाही खात्यानिहाय मंत्री नाही. त्यामुळे कामात अनियमितता होत आहे. अधिकारी सांगतील तेच ग्राह्य धरले जात आहे. त्यामुळे बांधावरची स्थिती लक्षात येणार नाही. पालकमंत्री यांच्याकडून आढावा घेऊन मदत करणे सोपे झाले असते पण या दोघांनाच सरकार चालवायचे आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टिका केली. शिवाय लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.