महाराष्ट्रात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत
Farmer news : महाराष्ट्रातील शेतीची बातमी एका क्लिकवर, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे.

महाराष्ट्र : दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे (SINDHUDURG) भागात जंगली हत्तीच्या कळपाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. येथील शेतकऱ्यांच्या माड आणि केळीच्या बागांच हत्तींनी मोठ नुकसान केलं आहे. हत्तीनी केळीच्या बागा जमीन दोस्त केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हत्तींचा हा कळप काही दिवस याचं भागात स्थिरावला असून शेतकऱ्यांच्या शेतीसह बागायतीचे नुकसान करत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे या हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तर पूर्व विदर्भातंही दुष्काळी स्थिती आहे, नागपूरसह (NAGPUR NEWS) पूर्व विदर्भात पावसाचा आठ दिवसांचा खंड पडला आहे. सोयाबीन, कापूस, धानासह इतर पिकांना फटका बसत आहे. फुलोरा स्थितीत असलेल्या (Farmer news) सोयाबीनला पावसाची गरज आहे. सोयाबीनच्या पीकातून साडेतीन ते चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो. त्यामुळे दिवाळीत पैसा खर्चाला मिळावा म्हणून विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रामाणात सोयाबीनची लागवड करतात. पण आता पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनचं पिकही संकटात सापडलं आहे.
राज्यात कांद्याचे भाव गडगडले केंद्र सरकारचे निर्यात धोरणाच्या विरोधात अनेक आंदोलन झाली. मात्र बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कांदा शेतातील चाळणीत साठवून ठेवण्यात धन्यता मानली आहे. मावळातील बहुतेक शेतकरी कांद्याचे आंतर पिकं घेतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा फायदेशीर आहे. कांदा पिकाचे नियोजन योग्यवेळी केल्यास कांदा शेतकऱ्यांना परवडतो.
येवल्यात पावसाअभावी शेतातील उभी पिके वाळली
नाशिकच्या येवला तालुक्यात गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असून अक्षरशः पिके पूर्णपणे वाळत असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मका, सोयाबीन पिकावर अळीच्या प्रादुर्भावा नंतर आता पावसाअभावी पिके होरपळत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे.
उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला
दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या आरापूर गावातली ही घटना आहे. ज्ञानेश्वर थोरात असं रोटावेटर फिरवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या शेतातील पीक सुकून जात होते. मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिके सुकून जाण्याचा धोका आहे.
20 दिवसा पासून पावसाचा थेंबही पडला
अमरावती जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीसह तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच नुकसान झालं, तर आता अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा अल्प म्हणजे 20 टक्केचं पाऊस झाला आहे, तर 20 दिवसा पासून पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे शेतात जमिनीला भेगा पडल्या आहेत. सोयाबीन फुलोरा अवस्थेत आलं, तर काही ठिकाणी शेंगा आल्यात मात्र पाऊसच बेपत्ता असल्याने 50 टक्के उत्पादन घटणार असल्याची शक्यता आहे.