Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा राज्याला झोडपले, शेतकरी दुहेरी संकटात

भंडारा जिल्ह्यात सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा राज्याला झोडपले, शेतकरी दुहेरी संकटात
unseasonal rainImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 5:42 PM

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चितोडा (chitoda) या गावातील गोपाल कवळे हे शेतात काम करीत असताना अचानक् विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह (Unseasonal Rain) पावसाला सुरुवात झाली. शेतकरी गोपालं कवळे यांनी लिंबाच्या झाडाचा सहारा घेतला, तेव्हाच वीज त्या झाडावर पडली आणि त्यात गोपाल कवळे जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबास आज आंबादास दानवे यांनी सांत्वनपर भेट दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून अर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. राज्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यात सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सहा दिवस अगोदर असाचं अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. पुन्हा एकदा सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना फटका बसणार असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

परभणी जिल्ह्यात रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, तर रात्रभर सुसाट वारे वाहत होते. वाहणाऱ्या सुसाट वाऱ्यामुळे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे अंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंता परत वाढली. दरम्यान, महसूल अधिकारी मात्र नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले नसल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पाऊस झाला आहे . वाऱ्यासह पाऊस झाल्याने भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनीं भागातही अवकाळी पाऊस झाला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागातील वांजरखेड येथे वीज पडून रेखा पाटील ( वय-३५) या महिलेचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर ,लातूर ,देवणी,निलंगा,उदगीर,औसा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. सायंकाळनंतर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, त्यातच काल अवकाळी पाऊस झाला आहे.

'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.
मुंबईकरांनो.. उद्या लोकलने प्रवास करणार आहात? बघा कसा असणार मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो.. उद्या लोकलने प्रवास करणार आहात? बघा कसा असणार मेगाब्लॉक?.
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा.
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?.
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?.
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान.