Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ
द्राक्षाचे नुकसान झाले किमान बेदाण्यातून का होईना उत्पन्न मिळेल असा आशावाद सांगलीसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होता. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळीने दाखवलेली अवकृपा ही अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहिली आहे. नोव्हेंबरपासून द्राक्षाचा हंगाम सुरु झाला आणि त्याच महिन्यापासून अवकाळीची अवकृपा. आता द्राक्ष हंगाम तर अंतिम टप्प्यात आहे पण बेदाणा उत्पादनातही तब्बल 20 हजार टनाची घट होण्याचा धोका आहे.
सांगली : द्राक्षाचे नुकसान झाले किमान (Raisin) बेदाण्यातून का होईना उत्पन्न मिळेल असा आशावाद (Sangli District) सांगलीसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होता. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून (Unseasonable Rain) अवकाळीने दाखवलेली अवकृपा ही अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहिली आहे. नोव्हेंबरपासून द्राक्षाचा हंगाम सुरु झाला आणि त्याच महिन्यापासून अवकाळीची अवकृपा. आता द्राक्ष हंगाम तर अंतिम टप्प्यात आहे पण बेदाणा उत्पादनातही तब्बल 20 हजार टनाची घट होण्याचा धोका आहे. अतिवृष्टी, अवकाळी आणि वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. यंदा 1 लाख 50 हजार टन बेदाणा निर्मितीचा अंदाज आहे. द्राक्षाबरोबर बेदाणा निर्मितीवरही परिणाम हा झालेला आहे.
दर टिकून पण उत्पादनात घट
वातावरणातील बदलामुळे बेदाणा निर्मिती ही लांबणीवर पडलेली आहे. मात्र, उत्पादनच घटल्याने यंदा दर हे टिकून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. बेदाणा निर्मितीस अडथळे निर्माण झाले असल्याने गतवर्षीच्या तुलनेत 20 हजार टनाने उत्पादन हे घटले आहे. गतवर्षी राज्यात 1 लाख 70 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. पण यंदा 1 लाख 50 हजार टनापर्यंतच उत्पादन राहणार आहे. द्राक्ष फळ छाटणीपासून सुरु झालेले संकट संपूर्ण हंगामात कायम राहिल्याने उत्पादनात मोठी घट झाली तर द्राक्ष बागांचे भवितव्य देखील अंधारात आहे.
निर्यात घटूनही दर चांगला
उत्पादन घटल्याने यंदा शेतीमालाचे दर हे टिकून आहेत. यातच रशिया आणि युक्रेनमध्ये होणारी बेदाण्याची निर्यात थंडावली आहे. त्यामुळे देशाअंतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला बेदाणा निर्मितीची प्रक्रिया ही कासव गतीने सुरु झाली होती. पण पुन्हा शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. पण येथेही निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पादन पदरी पडले नाही. शिवाय अनेकांचे नुकासानही झाले.
बेदाण्याचे उत्पादन अन् दर
गत तीन ते चार वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वात कमी उत्पादन बेदाण्याचे झाले आहे. राज्यात 2018-19 मध्ये 1 लाख 90 हजार टन, 2019-20 मध्ये 2 लाख 10 हजार टन, 2020-21 मध्ये 1 लाख 70 हजार टन तर यावर्षी 1 लाख 50 हजार टन. केवळ निसर्गाच्या लहरीपणाचा हा परिणाम असून शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. तर बेदाण्याचे दर टिकून आहेत हि दिलासादायक बाब आहे. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 160 ते 220 मध्यम 70 ते 125 रुपये किलो तर तीन नंबरच्या बेदाण्याला 10 ते 40 रुपये असे दर आहेत.
संबंधित बातम्या :
Kharif Season : गावनिहाय होतेय खरीप हंगामाचे नियोजन, शेतकऱ्यांसाठी कोणत्या 25 बाबी महत्वाच्या ?
Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन
Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला
https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos