Farmer Success Story : या पिकाने शेतकऱ्याला केलं मालामाल, खर्च कमी उत्पन्न अधिक, आदर्श शेतकरी…

| Updated on: Aug 07, 2023 | 8:43 AM

Farmer News in Marathi : अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे १०० दिवसात त्या शेतकऱ्याने दोन एकरात लाखो रुपयांची कमाई केली आहे.

Farmer Success Story : या पिकाने शेतकऱ्याला केलं मालामाल, खर्च कमी उत्पन्न अधिक, आदर्श शेतकरी...
Farmer Success Story (1)
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती : अमरावती (Farmer News in Marathi) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं त्या भागात सगळे कौतुक करीत आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याने १०० दिवसात दोन एकर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे हे सगळं शक्य झालं असल्याचं त्या शेतकऱ्याने सांगितलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी प्रदीप बंड (Chandur bazar farmer pradip band) यांनी टोमॅटोचं पीक (tomato rate) आधुनिक पद्धतीने घेतलं आहे. दोन एकर असलेल्या शेतीमध्ये कमी खर्चात त्यांनी चांगलं उत्पन्न घेतलं आहे. तालुक्यात त्यांना आदर्श शेतकरी म्हणायला आता सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावचे शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला देखील जात आहेत.

प्रदीप बंड यांनी टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात पिकांची दिवसरात्र पाहणी केली. शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले.

सध्या त्यांच्या शेतात चांगल्या प्रकारचे टोमॅटो आहेत. त्याचबरोबर टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. चांदुर बाजार , अमरावती परतवाडा, या बाजारपेठेमध्ये त्याच्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर भाव असल्याने त्यांना अधिक फायदा झाला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात भाव मिळाला, तर कुठलाही शेतकरी कधीचं आत्महत्या करणार नाही.

हे सुद्धा वाचा

बी-बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी शेतकरी प्रदीप बंड यांचे जवळपास दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचा अधिक पैसे टोमॅटोच्या विक्रीतून मिळाले आहेत.

मागच्या महिन्यापासून देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. ज्यावेळी बाजारात टोमॅटो या पिकाची आवक वाढेल त्याचवेळी टोमॅटोचे दर कमी होतील असंही ते म्हणाले आहेत.