अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात एका शेतकऱ्याला जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावणे एका कृषी केंद्र चालकाच्या चांगलचं अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी केंद्र चालकाने जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावली असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. संत्राच्या झाडावर (orange crop destroyed) औषध फवारणी केल्यानंतर ९०० झाडं बाधित झाली आहेत. झाडांना लागलेली फळ गळून पडू लागल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काही शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. आजा अमरावती जिल्ह्यातील कृषी विभाग (Agricultural news) केंद्र चालकावरती कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील दिलालपुर येथील संत्रा उत्पादक शेतकर्यांनी चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली. त्यावेळी दुकानात असलेल्या कृषी केंद्र चालकांनी सांगितलेले औषध दिले नाही. इतर औषध दिले अशी माहिती संत्रा उत्पादक शेतकरी केशव दाभाडे आणि माणिक दाभाडे यांनी केली.
ज्यावेळी कृषी केंद्र चालकाने दिलेल्या औषधांची फवारणी संत्रांच्या झाडांवर केली. त्यावेळी संत्रा झाडांची पानं गळून पडली. त्यानंतर काहीवेळाने संत्रा फळ सुध्दा गळून खाली पडले आहे. काही संत्राची फळ झाडांवर पिवळी होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांची ९०० झाडं बाधित झाली असून त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.
शिवार कृषी केंद्राचे संचालक अनिकेत घोरमाडे यांच्यावर शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, की त्यांनी चुकीची औषध दिली. अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागाकडे याबाबत तक्रार दाखल झाली असून शिवार कृषी केंद्राचा परवाना रद्द करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.