Rabi Season अंतिम टप्प्यात, शेतीमालाची साठवणूक करायची कशी? शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

अधिकचे उत्पादनापेक्षा उत्पादित झालेला शेतीमाल साठवणूक आणि त्यासाठी योग्य बाजारपेठ असणे गरजेचे आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शेतीमालाच्या साठवणूकीची योग्य माहिती शेतकऱ्यांना नसल्याने लवकर मालाचे नुकसान होते. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा येथील कृषी तंज्ञानी दिलेला सल्ला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. शेतीमालाची अर्थात गव्हाची साठवणूक करण्यापूर्वी गोदाम हे स्वच्छ करावे लागणार आहे. शिवाय धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण हे 12 टक्क्यांपेक्षा अधिक नसायला पाहिजे.

Rabi Season अंतिम टप्प्यात, शेतीमालाची साठवणूक करायची कशी? शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
रबी हंगाम संपताच बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:32 PM

मुंबई : अधिकचे उत्पादनापेक्षा उत्पादित झालेला (Agricultural Good) शेतीमाल साठवणूक आणि त्यासाठी योग्य बाजारपेठ असणे गरजेचे आहे. सध्या (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, (Agricultural Stock) शेतीमालाच्या साठवणूकीची योग्य माहिती शेतकऱ्यांना नसल्याने लवकर मालाचे नुकसान होते. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा येथील कृषी तंज्ञानी दिलेला सल्ला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. शेतीमालाची अर्थात गव्हाची साठवणूक करण्यापूर्वी गोदाम हे स्वच्छ करावे लागणार आहे. शिवाय धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण हे 12 टक्क्यांपेक्षा अधिक नसायला पाहिजे. एवढेच नाही तर ज्या भांडारात शेतीमालाची साठवणूक करयला आहात त्या भांडार स्वच्छ तर करुन घ्यावेच लागणार आहे पण छताला किंवा भिंतींना भेगा पडल्या असतील तर त्या भरून त्या दुरुस्त करावे लागणार आहे. पीक काढणीनंतर लागलीच बांधणी करणे महत्वाचे आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही भागात अवकाळी पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. रब्बीची कामे उरकताच शेजमिनीची मशागत करुन शेत तसेच ठेवावे लागणार आहे. जेणेकरुन त्याचा पोत वाढेल.

मूगाबरोबर भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण

मूगाच्या वाणामध्ये पुसा विशाल, पुसा 672, पुसा 9351 पंजाब 668 या वाणाची बियाणे चांगली आहेत. शिवाय पेरणी करताना जमिनीत योग्य ओलावा आहे का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पेरणीपूर्व बियाणांवर रायझोबियम आणि फॉस्फरस विद्रव्य जीवाणूंचा वापर करुन बीजप्रक्रिया करणे महत्वाचे राहणार आहे. सध्याचे तापमान हे भाजीपाला लोबिया, चवळीच्या शेंगा, भेंडी, भोपळा, काकडी, तुरई आणि उन्हाळी हंगामातील मुळा इत्यादीसाठी अनुकूल आहे. कारण याच तापमानात बियाणांची वाढ जोमात होते. प्रमाणित स्त्रोताकडून प्रगत वाणांच्या बियाण्यांची पेरणी करा. वाढते तापमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला,व नर्सरी, किंवा फळबागांमध्ये नियमित अंतराने सिंचन करावे. नर्सरी आणि झाडांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी ग्रीन कपड्याचा वापराचा सल्ला दिला जातो.

रब्बी पिकांच्या काढणीनंतर काय ?

रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर या क्षेत्रात हिरवा चारा यासारखी उत्पादन घेता येते. फक्त पेरणी करताना शेतजमिनीमध्ये योग्य ती ओल असणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी शेतजमिनीची मशागतही महत्वाची आहे. रब्बी हंगामानंतर शेती मशागत करुन काही दिवसांची विश्रांती दिल्यावर उत्पादनात वाढ तर होतेच पण शेतजिमनीचे आरोग्य टिकून राहत असल्याचा सल्ला पुसा संस्थेतील कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

कांदा पिकाबाबत सल्ला

कांदा पिकात या टप्प्यावर खते देऊ नका, कारण कांद्यापेक्षा तण वाढण्याची अधिक शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे वांगी आणि टोमॅटो यावरील कीड रोगराईचा बंदोबस्त करावा लागणार आहे. किटकनाशकांचे निरीक्षण करुन पेरोमोन संतती @ 2-3 प्रति एकर लावा. कीटकांची संख्या जास्त असल्यास, हवामान स्वच्छ असताना स्पिनोसैड कीटकनाशक 48 ईसी 1 मिली हे 4 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Watermelon : उत्पादन वाढीसाठी कायपण!, हनुमंतगाव शिवारात कलिंगड शेतातच भव्य मेळावा

Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले, तुरीच्या दराने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली

Video : शॉर्टसर्किटमुळे शेतीमालाची होळी, डोळ्यासमोरच स्वप्नांचा चुराडा झाल्याने शेतकऱ्याचा टाहो

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.