या राज्यातील आंबा महाराष्ट्रात विक्रीसाठी, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण
महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात अजूनही आंबा विक्रीसाठी येत आहे. हा आंबा परराज्यातील असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
नांदेड : नांदेडच्या (nanded news) फळ मार्केटमध्ये अजूनही आंब्याची (mango market) आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सद्या आंध्र प्रदेशातील निलम आंब्याची (andhra pradesh nilam mango) आवक नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रोज किमान आठ ते दहा टन आंबा नांदेड विक्रीसाठी दाखल होत आहे. आवक वाढल्याने नीलम आंब्याचे भाव घसरले आहेत. 35 ते 40 रुपये किलो आंब्यांची विक्री होत आहे. यावर्षी पावसाचा वेळी अवेळी झाल्यामुळे अजून आंब्याचा सीजन सुरु असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्हात पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी पेरणी करीत आहेत.
सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित…
नांदेडमध्ये पावसाचे आगमन झाल्याने सहस्त्रकुंड इथला धबधबा प्रवाहित झाला आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन महाराष्ट्रात उशिराने झाल्याने धबधबा प्रवाहित होण्यासाठी एक महिना उशिर झाला आहे. अद्याप नांदेडला दमदार पाऊस झालेला नाही. लोकं दमदार पावसाची वाट पाहत आहेत. ज्या पद्धतीने पूर्वी धबधबे पाहायला मिळायचे, तसे सध्या पाहायला मिळत नाहीत.
शिवारात जोरदार पावसाची हजेरी
नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात त्याचबरोबर नायगावसह, मुखेड तालुक्यात पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. मुखेडच्या बेटमोगरा शिवारात या मोसमातील पहिलाच चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. एक महिना पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. पावसानंतर आता खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामाला गती मिळणार आहे. थोड्या विलंबाने आलेल्या या पावसाने पीक पद्धतीत शेतकऱ्यांना थोडा बदल करावा लागणार असे चित्र आहे.
यावर्षी मॉन्सून लांबल्याने नांदेड जिल्ह्यात भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. टोमॅटो आणि हिरव्या मिरचीला प्रति किलो शंभर रुपये मोजावे लागत आहेत. भेंडी, दोडका, मेथी आणि शेवगा बाजारात दिसत नसल्यामुळे काय खरेदी करावं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अधिक भाज्या बाजारात दिसत नसल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आता डाळींचे दर सुध्दा वाढले आहेत.