Hingoli : वसमतमध्ये हळद संशोधन केंद्राची होणार उभारणी, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?
जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याकरिता 100 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याकरिता हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या बैठका पार पडून एक मसुदा तयार करण्यात आला होता. यानंतरच अर्थसंकल्पात वसमत येते केंद्र उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. आता काही दिवसांमध्ये येथे कोट्यावधी रुपये खर्ची करुन केंद्रही उभारले जाईल मात्र,शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार याची माहिती असणेही गरजेचे आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे (Agricultural Research Centre) कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याकरिता 100 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याकरिता (Turmeric) हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या बैठका पार पडून एक मसुदा तयार करण्यात आला होता. यानंतरच (Budget) अर्थसंकल्पात वसमत येते केंद्र उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. आता काही दिवसांमध्ये येथे कोट्यावधी रुपये खर्ची करुन केंद्रही उभारले जाईल मात्र,शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार याची माहिती असणेही गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 1 लाख हेक्टर हळदीचे क्षेत्र आहे. शिवाय वर्षागणीस यामध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत वसमतच्या बाजारपेठेत मराठवाड्यासह इतर भागातून हळदीची आवक होत होती. भविष्यात याच बाजारपेठेच्या परीसरात उद्योग उभारले जाणार आहेत. त्यामुळे या संशोधन केंद्राचा हळद उत्पादकांना तर फायदा होणार आहेच पण इतर घटकांनाही चालना मिळणार आहे.
संशोधन केंद्राचा नेमका फायदा काय होणार?
येथील संशोधन केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे शेतामध्ये उत्पादित झालेला माल किमान दोन वर्ष टिकवता येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या अग्री बायोटेक विभागामार्फत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. हळदीचे संकरित बियाणे, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन व हळदीसाठी लागणारे कृषी अवजारे, यांत्रिकिकरण,बॉयलर व पोलिशर साहित्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती-पाणी तपासणी केंद्र आदी सुविधा केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे.
हिंगोलीच्या हळदीला नवसंजीवनी
हिंगोली येथे शेतकऱ्यांना निरोगी बेणे उपलब्ध करुन देण्यासाठी संशोधन होणार आहे. यापूर्वी बियाणे चांगल्या प्रतीचे नसल्याने उत्पादनात घट तर शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. एवढेच नाही टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारुन त्यावरही काम केले जाणार आहे. पिकांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी रेडिएशन सेंटर, कूल स्टोअरेजची व्यवस्था होणार आहे. एक जिल्हा एक पीक या योजनेत हिंगोलीचा अगोदरच समावेश झाला आहे. जिल्ह्यात 1 लाख 75 हजार एकरावर हळदीचे सरासरी क्षेत्र आहे.
अंतराष्ट्रीय बाजारपेठेत हिंगोलीचा दबदबा
आतापर्यंत जिल्ह्यात केवळ विक्रमी उत्पादन होत होते. पण संशोधन केंद्रामुळे तंत्रशुध्द पध्दतीने वाढीव उत्पादन कसे घ्यावे याची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. तर याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यात होत असून येथून अधिकची निर्यात केली जात होती. मात्र, प्रक्रिया उद्योगामुळे व्यवसायाला चालना मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यातील व्यवस्थापनाने वाढेल उत्पादन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
महावितरणचा ‘शॉक’ फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना
सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू – तांदळावर, काय आहे नेमके कारण?