Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!

राज्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांचे मोठे योगदान मानले जाते. शिवाय शेती क्षेत्राची आवड आणि त्याबद्दल त्यांना अधिकची माहितीही. सध्या राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तब्बल 90 लाख टनाहून अधिक उसाचे गाळप शिल्लक आहे. असे असताना शरद पवार यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालाच कशामुळे हे एका वाक्यात सांगून ऊस उत्पादकांना महत्वाचा सल्लाही दिला आहे.

Sharad Pawar: 'आळशी माणसांचा भर उसावर' एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवारImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 3:36 PM

मुंबई : राज्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांचे मोठे योगदान मानले जाते. शिवाय शेती क्षेत्राची आवड आणि त्याबद्दल त्यांना अधिकची माहितीही. सध्या राज्यात अतिरिक्त (Sugarcane Sludge) उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तब्बल 90 लाख टनाहून अधिक उसाचे गाळप शिल्लक आहे. असे असताना (Sharad Pawar) शरद पवार यांनी (Excess Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालाच कशामुळे हे एका वाक्यात सांगून ऊस उत्पादकांना महत्वाचा सल्लाही दिला आहे. ऊस हे आळशी माणसाचे पीक आहे. म्हणजेच एकदा लागण झाली की अधिकचे कष्ट नाहीत की हात मशागत नाही. लागवडीपासून, सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्याने. त्यामुळे ऊस हे आळशी माणसांचे पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेण्यास सोपे असल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लागवड करण्याचा सल्ला त्यांनी ऊस उत्पादकांना दिला आहे.

शरद पवारांनी सांगितला मधला मार्ग

वर्षानुवर्ष राज्यात उसाचे क्षेत्र हे वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घ्यावे पण त्याच बरोबर खरिपातील कापूस, सोयाबीनचाही पेरा करावा लागणार आहे. शिवाय फळबाग क्षेत्र वाढवण्यावर भर दिला तर उत्पादन वाढणार आहे. केवळ ऊस म्हणल्यावर नुकासनीचे ठरणार आहे. हंगामी पिकांकडे दुर्लक्ष होत असून लागवडी की वर्षभराने तोडणी अशा पिकावरच शेतकऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे मात्र, जमिनीचा पोत आणि दर्जा यावर देखील परिणाम हा होतोच.

हंगामी पिकांनाही विक्रमी दर

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी आता हंगामी पिकांचे दरातही वाढ होत आहे. यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा मोठा वाटा आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हे हुकमी पिक असून दिवसेंदिवस सोयाबीन पेऱ्यात ही वाढ होत आहे. शिवाय यंदा कापसाला 12 हजार रुपये क्विंटल तर सोयाबीनला 7 हजार 300 रुपये दर मिळाला आहे. वर्षभराचा कालावधी आणि उत्पन्नाचा विचार केला तर हंगमी पिकेच परवडतात पण सिंचनाची सोय झाली की उसावरच भर दिला जात असल्याचे चित्र.

90 लाख टन ऊस गाळपाविना

ऊसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदाच्या हंगामात सर्व क्षेत्रावरील ऊसाची तोड होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण गाळप सुरु होऊन सहा महिने उलटली असताना देखील राज्यात 90 लाख टन ऊसाचे गाळप बाकी आहे. शिवाय आता पावसाला सुरवात झाली तर तोड रखडलीच. सर्वाधिक गाळपाचा प्रश्न मराठवाड्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढत्या ऊस क्षेत्रावर खा. शरद पवार यांनी सांगितलेला सल्ला किती शेतकरी मनावर घेतील हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

State Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय, गावापासून 200 मीटर जमिनीला आता नाही N.A ची गरज

Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?

Onion Rate: शेतकऱ्यांचा वांदा अन् रुपया किलो कांदा, 5 वर्षातील निच्चांकी दर कोणत्या बाजार समितीमध्ये ?

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...