Hapus Mango : नुकसानीनंतरही फळांच्या ‘राजा’चा तोरा कायम, स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल..!
हंगामाच्या सुरवातीपासून एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर फळांचा राजा असलेला हापूस आंबा आता स्थानिक बाजारपेठेमध्येही दाखल झाला आहे. यापूर्वी केवळ मुख्य बाजारपेठेत हापूसचे आगमन झाले होते. पण आता हंगाम मध्यावर असताना रत्नागिरीसह लगतच असलेल्या पावस, गणेशगुळे आणि गणपतीपुळे येथीव स्थानिक बाजारपेठतही आवक झाली आहे. नुकासनीचा सामना करुनही या हापूसचा दरातील तोरा हा कायम आहे.
रत्नागिरी : हंगामाच्या सुरवातीपासून एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर फळांचा राजा असलेला (Hapus Mango) हापूस आंबा आता स्थानिक बाजारपेठेमध्येही दाखल झाला आहे. यापूर्वी केवळ मुख्य बाजारपेठेत हापूसचे आगमन झाले होते. पण आता हंगाम मध्यावर असताना (Ratnagiri) रत्नागिरीसह लगतच असलेल्या पावस, गणेशगुळे आणि गणपतीपुळे येथीव (Local Market) स्थानिक बाजारपेठतही आवक झाली आहे. नुकासनीचा सामना करुनही या हापूसचा दरातील तोरा हा कायम आहे. नुकसानीनंतर दरात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण हापूस आंब्याने आपले मार्केट कायम ठेवले आहे. एक डझन हापूससाठी 1 हजार 200 ते 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. असे असतानाही खवय्ये हापूसची खरेदी करतातच पण सर्वसामान्यांना मात्र, आवर घालावी लागत असल्याचे चित्र आहे. आता कुठे हापूसचे आगमन झाले आहे. दर नियंत्रणात येण्यासाठी काही आवधी जाऊ द्यावा लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षीपेक्षा उत्पादनात घट
यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा बागांवर अवकाळी आणि ढगाळ वातावरणाची अवकृपा राहिलेली आहे. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर परिणाम झाला तर आता तोडणीच्या दरम्यान ऊन्हामध्ये वाढ झाल्याने थेट आंबा गळतीचा धोका निर्माण झाला होता. दरवर्षी पेक्षा यंदा केवळ 25 टक्केच आंब्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची मुख्य बाजारपेठेत आवक झाली आहे. शिवाय आता उन्हाचा चटका वाढत असल्याने मागणीही वाढत आहे. मात्र, मुळात उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा दर चढेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
15 दिवस उशिराने हापूसचे आगमन
दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की खवय्यांना आतुरता असते ती हापूस आंब्याची. किमान कोकण भागात तरी मार्चच्या सुरवातीलाच हा फळांचा राजा दाखल झालेला असतो. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर तर झालाच शिवाय हंगामही लांबला. त्यामुळे सुरवातीला विक्रमी दर मिळणारच पण हंगामाच्या अंतिम टप्यात काहीशे दर घटतील. फळगळ, कीड-रोगराई, यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा निर्यातीबद्दलही संभ्रम अवस्था होती. मात्र, गतआठवड्यातच पुणे येथून अमेरिकेला हापूसची निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले तरी वाढीव दरातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का ते पहावे लागणार आहे.
सध्याचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे
मुख्य बाजारपेठानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेतही हापूसची आवक सुरु झाली आहे. रत्नागिरी लगतच असलेल्या पावस गणेशगुळे आणि, गणपतीपुळे इथून स्थानिक बाजारात आंबा दाखल झालाय. पण दर हे 2 हजार रुपये डझनच्या घरात असल्याने सर्वसामान्य ग्राहक इच्छा असूनही खरेदी करु शकत नाहीत. आंब्याचे दर कमी होण्यासाठी खवय्यांना मे महिन्याचीच वाट पहावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
SINDHUDURG मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त