Rabi Season: ज्वारी बाजारात, पहिला मान सोलापूर बाजार समितीला, हंगामाच्या सुरवातीला मुख्य पिकाचे चित्र काय?
मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारीला तर भौगोलिक मानांकनही मिळालेले आहे. यंदा ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात सरासरी 10 लाख हेक्टरावर पेरा होतो. यंदा क्षेत्रात आणि आता ज्वारी उताऱ्यामध्ये कमालीची घट पाहवयास मिळत आहे. ज्वारी आवकचा श्रीगणेशा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला असला तरी आवक खूपच कमी आहे.

सोलापूर : मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील (Sorghum crop) ज्वारी हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारीला तर (Geographical Rating) भौगोलिक मानांकनही मिळालेले आहे. यंदा ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाली असली तरी (Solapur) सोलापूर जिल्ह्यात सरासरी 10 लाख हेक्टरावर पेरा होतो. यंदा क्षेत्रात आणि आता ज्वारी उताऱ्यामध्ये कमालीची घट पाहवयास मिळत आहे. ज्वारी आवकचा श्रीगणेशा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला असला तरी आवक खूपच कमी आहे. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीला ज्वारीचे दर हे वाढलेले आहेत. सध्या ज्वारीला सरासरी 2 हजार 300 असा दर मिळत आहे. ही सुरवात असून पुढील काळामध्ये दरात बदल दिसतील हे नक्की.
हंगामाच्या सुरवातीला 20 ते 25 क्विंटलची आवक
सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले जात होते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. पण यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला असून पारंपरिक पिकांऐवजी कडधान्य व तेलबियांना अधिकचे महत्व दिले आहे. काळाच्या ओघात ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट होत आहे. सध्या ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. दिवसाकाठी केवळ 20 ते 25 क्विंटलची आवक होत आहे. आवक कमी असल्याने ज्वारीला अधिकचा उठावही आहे.आता कुठे हंगामाला सुरवात झाली आहे. 15 दिवसांनी ज्वारीची आवक वाढेल तेव्हाच दराचे नेमके चित्र काय राहणार हे समोर येईल.
गहू अन् ज्वारीला समानच दर
गहू आणि ज्वारी ही रब्बी हंगामातील पारंपरिक पिके आहेत. काळाच्या ओघात या पिकांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यापूर्वी गव्हाला अधिकचा दर होता. पण आता ज्वारीचे उत्पादनच कमी झाल्याने दर वाढत आहेत. ज्वारीला प्रति क्विंटल किमान 2 हजार 100 तर सरासरी 2 हजार 300 असा दर आहे. मालदांडीसारख्या वाणाला सर्वाधिक 2 हजार 800 पर्यंतचा दर आहे. दरवर्षी दरात होत असलेली घट आणि काढणीसाठी मजुरांची टंचाई यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात घट होत आहे तर दुसरीकडे गव्हाला प्रति क्विंटल 2 हजार 300 ते 2 हजार 500 असा दर मिळत आहे.
हंगामाच्या सुरवातीला स्थानिक पातळीवरच माल बाजारात
ज्वारी पिकासाठी यंदा पोषक वातावरण होते. मुबलक पाणी आणि चांगल्या वातावरणामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव राहिलाच नाही. त्यामुळे उशिरा पेरणी होऊनही उत्पादनात कमी झाली नाही. तर ज्या भागात उशिराची पेर आहे तिथे मात्र उतारा कमी मिळालेला आहे. सध्या परजिल्ह्यातून नव्हे तर स्थानिक पातळीवरुनच ज्वारीची आवक सुरु आहे. अजून काढणी, मळणी कामे शिल्लक असल्याने आवक वाढत नसल्याचे व्यापारी राहुल मुंडे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Drone Farming: ‘ड्रोन’ खरेदीबाबत महत्वाचा निर्णय, नियमांचे पालन करा अन्यथा कृषी संस्थांनाचा भुर्दंड
Latur Market : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, शेतकरी करणार का संधीच सोनं…!