सोलापूर : गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ असली तरी त्यापेक्षा अधिकच्या (Arrival of Onion) कांद्याची आवक ही (Solapur) सोलापूरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून येथील व्यवहार हे ठप्प होते. गुरुवारी तिसऱ्या दिवशी बाजार समिती सुरु होताच पुन्हा विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याच्यामुळे अट्टाहास केला होता त्याचीच पुन्नरावृत्ती पुन्हा झाली असल्याचे चित्र आहे. गुरुवारी 800 ट्रकमधून कांद्याची आवक झाली होती. (Kharif Onion) खरिपातील कांद्याची आवक सुरु असून सध्याचे वातावरण आणि उत्पादनात झालेली वाढ याचा परिणाम थेट बाजारपेठेत पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बाजारपेठ बंद ठेवायची का नाही याबाबत प्रशासनाला विचार करावा लागणार आहे.
गुरुवारची आवक पाहता पुन्हा शुक्रवारी बाजार समिती सुरु ठेवायची का बंद? याबाबत प्रशासनाची बैठक पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी अशीच आवक झाल्याने व्यवहार हे बंद ठेवण्यात आले होते. 800 ट्रकच्या माध्यमातून दाखल झालेल्या कांद्याचे व्यवहार आणि साठवणूक यासाठी लागणारा कालावधी आणि पुन्हा उद्या होणारी आवक या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेतला जाणार आहे.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही मध्यवर्तीचे ठिकाण आहे. शिवाय लासलगाव पाठोपाठ कांदा मार्केटसाठी ही बाजारपेठ प्रसिध्द आहे. सिध्देश्वर यात्रेपासून येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे. मध्यंतरी यात्रेमुळे तीन दिवस व्यवहार हे बंद होते तर नंतर बाजारपेठ सुरु होताच 1 हजारहून अधिक ट्रकमधून कांद्याची आवक झाली होती. असे असतानाही सरासरी एवढा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आता कांदा काढणीची लगबग सुरु आहे. शिवाय काढलेला कांदा थेट बाजार समितीमध्ये पाठवला जात असल्याने दोन दिवसापूर्वीही मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यामुळे खरेदी झालेल्या कांद्याचे व्यवहार आणि साठवणूक व्हावी म्हणून दोन दिवस बाजार समिती ही बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा आवक वाढलेली आहे.
दोन दिवस बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार हे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी आवक वाढणार हे अपेक्षित होते मात्र, ज्या तुलनेत आवक वाढत आहे यापुर्वी कांद्याची एवढी आवकच झाली नसल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांच्या आहेत. दोन दिवसांपूर्वी 933 ट्रकमधून कांदा दाखल झाला होता तर बुधवारी मध्यरात्रीपासून आवक होण्यास सुरवात झाली होती. 800 ट्रकमधून कांदा आला असून याचा दरावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय
निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?