AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : संत्री-आंब्याची आवक घटली अन् केळीचा गोडवा वाढला, खानदेशात कसे बदलले फळांच्या दराचे चित्र?

राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी खानदेशात मात्र उन्हाच्या झळा कायम आहेत. जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशावर गेल्याने आंबा फळपिकावर याचा परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादन हे घटलेले आहेच शिवाय बाजारपेठेत दाखल होणारा आंबा वाढत्या तापमानामुळे डागाळत आहे.

Jalgaon : संत्री-आंब्याची आवक घटली अन् केळीचा गोडवा वाढला, खानदेशात कसे बदलले फळांच्या दराचे चित्र?
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 10:51 AM
Share

जळगाव : मध्यंतरी बाजारपेठेत (Mango Arrival) आंब्याची आवक होताच कलिंगडचे दर गडगडले होते. जे कलिंगडच्या बाबतीत झाले तेच आता खानदेशात आंबा उत्पादकांच्या बाबतीत होत आहे. जिल्ह्यात (Temperature Increase) वाढत्या तापमानामुळे आंबा आणि संत्र्याची आवक कमी झाली आहे. याचा फायदा मात्र, (Banana) केळी उत्पादकांना होताना दिसत आहे. कारण हंगामाच्या सुरवातीपासून केळी पिकाची दराबाबत परवड सुरु होती. अखेर हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दिलासा मिळू लागला आहे. केळीला प्रतिक्विंटल 1 हजार 400 असा दर मिळत आहे. खानदेशात प्रतिकूल परस्थितीमध्येही केळी उत्पादनात वाढ झाली पण शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतिक्षा होती ती आता पूर्ण होतान पाहवयास मिळत आहे.

वाढत्या तापमानाचा परिणाम काय?

राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी खानदेशात मात्र उन्हाच्या झळा कायम आहेत. जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशावर गेल्याने आंबा फळपिकावर याचा परिणाम झाला आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादन हे घटलेले आहेच शिवाय बाजारपेठेत दाखल होणारा आंबा वाढत्या तापमानामुळे डागाळत आहे. तर दुसरीकडे संत्रीची आवक दिवसेंदिवस घटत आहे. या दोन्हा बाबींचा परिणाम थेट केळीवर झाला आहे. हंगामात पहिल्यांदाच केळीची मागणी तर वाढली आहेच शिवाय दरही वधारले आहेत.

केळीच्या दरात दुपटीने वाढ

हंगामाच्या सुरवातीला केळीची बाजारपेठेतील आवक आणि वातावरणातील बदलाचा झालेला परिणाम यामुळे 600 ते 700 रुपये क्विंटल असे दर होते. दरावरून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये सातत्याने मतभेदही झाले होते. अखेर व्यापारी ठरवतेल त्याच दरात केळी विक्रीची नामुष्की उत्पादकांवर ओढावली होती. अखेर आता परस्थिती बदलत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन असलेल्या रावेर येथील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे.

मागणीही वाढली अन् दरही

केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले फळपिक आहे. त्यामुळे इतर फळपिकांची आवक होताच त्याचा परिणाम हा केळीवर ठरलेलाच आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासून बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे केवळ केळीवरच नाही तर कलिंगडच्या दरावरही परिणाम झाला होता. पण घटलेले उत्पादन आणि आता वाढलेले तापमान या दोन्ही बाबींचा परिणाम बाजारपेठेतील आवकवर झाला आहे. आंबा आणि संत्रीची आवक घटली तरी दुसरीकडे केळीची आवक ही कायम आहे. त्याचाच फायदा रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.