Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!

खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे.

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 2:30 PM

लातूर : खरिपाच्या संपूर्ण हंगामात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Stock) शेती मालाची आवक ही जेमतेमच राहिली होती. सोयाबीन वगळता इतर पिकांची आवक झालीच नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट हे देखील यामागचे एक प्रमुख कारण होते. मात्र, आता चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. चार दिवसांपासून (Rabi Season) रब्बी हंगामातील (Arrival of Chickpeas) हरभऱ्याची आवक सुरु झाली असून दिवसेंदिवस आवकमध्ये वाढ होत आहे. चौथ्याच दिवशी हरभऱ्याची आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली आहे. तर दुसरीकडे अंतिम टप्प्यातील सोयाबीन विक्रीवरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 15 हजार पोत्यांची तर सोयाबीनच्या 17 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे कधी नव्हे ते बाजारपेठेत रेलचेल पाहवयास मिळाली आहे.

आवक वाढली दर मात्र स्थिरच

खरिपातील सोयाबीन आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवले असले तरी आता विक्रीला सुरवात केली आहे. सध्या सोयाबीनला सरासरी प्रमाणे 6 हजार 400 रुपये दर आहे. शेतकऱ्यांना दरात वाढ व्हावी असे वाटत असले तरी त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहेत. दुसरीकडे तुरीची आवकही वाढत आहे. हमीभाव केंद्रावरील दर अन् खुल्या बाजारपेठेतील दर हे समसमानच झाल्याने शेतकरी आता व्यापाऱ्यांकडेच तुरीची विक्री करीत आहेत.

हरभऱ्याची आवक वाढली दर घसरलेलेच

रब्बी हंगामातील हरभऱ्याचीही आवक सुरु झाली आहे. वातावरणातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा धोका टाळण्यासाठी शेतकरी काढणी आलेल्या हरभऱ्याची राशणी करीत आहे. शिवाय यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात उत्पादन किती होऊ शकते याची चुणूक दाखवली आहे. चार दिवसांपासूनच आवक सुरु झाली तर शनिवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. हरभऱ्याचे दर मात्र घटलेलेच आहेत. सध्या हरभऱ्याला 4 हजार 400 रुपये दर असून लवकरच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारण हरभऱ्याला 5 हजार 400 रुपये हमीभाव ठरवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

ऊसाचे गाळप झाले आता पाचटाचेही महत्व जाणून घ्या..! आजचे व्यवस्थापन हेच उद्याचे उत्पादन

सरकारला जमले नाही ते प्रशासन करुन दाखणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी काय आहे नवा पर्याय?

Drone farming technology : आधुनिक शेती करायचीय? मग मनसुख मांडवीय यांनी Share केलेला ‘हा’ Video पाहाच

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.