Solapur : दुष्काळात तेरावा, लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, कशामुळे ओढावली परस्थिती?

कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर गडगडण्यास सुरवात झाली.

Solapur : दुष्काळात तेरावा, लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, कशामुळे ओढावली परस्थिती?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 3:37 PM

सोलापूर : (Change Climate) वातावरणातील बदलामुळे फळांच्या दरात कमालीची घट झाली आहे. (Seasonable Fruit) कलिंगड, खरबूज या हंगामी फळांची बाजारपेठेत आवक वाढत आहे. असे असले तरी हंगामाची सुरवात दणक्यात झाली पण आता या फळांच्या मागणीत घट झाली आहे. यातच मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे तर शुक्रवारी (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या दोन फळांचे तर लिलावच झाले नाहीत. केवळ जांभूळ आणि डाळिंबालाच अधिकची मागणी होती. लिलावच झाले नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दर यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

उत्पन्न सोडा, वाहतूक खर्चही पदरून

कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर गडगडण्यास सुरवात झाली. किलोवर विकले जाणारे कलिंगड आता नगावर विक्री होत आहे.

बाजार समितीमध्ये लिलावच नाहीत

पहाटेपासून आवक झालेल्या शेतीमालाची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 पर्यंत लिलाव होतात. व्यापाऱ्यांकडून मागणी होते व किरकोळ विक्रेत्ये फळे, भाजीपाला घेऊन विकतात. मात्र, मोठ्या प्रमाणात आवक होऊन देखील शुक्रावारी वातावरणातील बदलामुळे लिलावच झाले नाहीत. खरबूज, कलिंगड हे बाजारपेठेतच पडून होते. आतापर्यंत कलिंगड 100 रुपयाला क्रेट तर खरबूज 300 रुपयांना असे दर होत. पण शुक्रावारी बोलीच झाली नाही त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

डाळिंब, जांभळाला मात्र मागणी

कलिंगड, खरबूजाच्या मागणीत घट असली तरी दुसरीकडे जांभूळ आणि डाळिंबाने आपले महत्व बाजारपेठेत टिकवून ठेवले आहे. यंदा डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामात मागणी होत आहे. पिन होल बोरर या किडीमुळे डाळिंबाचे क्षेत्र घटले असून आता उत्पादीत मालाला मागणी आहे. तर जाभळाचे उत्पादन घटल्यामुळे शहरी भागात अधिकची मागणी होत आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.