Latur Market: हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय ? सोयाबीनचं मात्र शेतकऱ्यांनी मनावर घेतलं
ज्याप्रमाणे खरिपातील सोयाबीन अन् कापसाच्या उत्पादनात घट झाली त्यापेक्षा अधिक परिणाम तुरीवर झाला होता. त्यामुळे सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीच्या दरातही वाढ होईल अशी अपेक्षा होती. शिवाय त्यानुसार वाढही सुरु झाली होती. 15 दिवसांपूर्वी तुरीला बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा दरात घट सुरु झाली असून अद्यापही ती कायम आहे.
लातूर : ज्याप्रमाणे (Kharif Season) खरिपातील सोयाबीन अन् कापसाच्या उत्पादनात घट झाली त्यापेक्षा अधिक परिणाम तुरीवर झाला होता. त्यामुळे सोयाबीन, कापसाप्रमाणेच (Toor Rate) तुरीच्या दरातही वाढ होईल अशी अपेक्षा होती. शिवाय त्यानुसार वाढही सुरु झाली होती. 15 दिवसांपूर्वी तुरीला (Latur Market) बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा दरात घट सुरु झाली असून अद्यापही ती कायम आहे. दर वाढत असतानाच केंद्र सरकारने जी मे पर्यंत तुरीची आयात केली जाणार होती त्याची मुदत आता डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात सुरु असल्यानेच तुरीच्या दरात घट होत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे दर हे स्थिर असून 7 हजार 350 हाच दर योग्य असल्याचे मानत आता आवक वाढत आहे.
तुरीच्या दरात असा झाला चढ उतार
तूर हे खरिपातील सर्वात शेवटचे पीक आहे. अंतिम टप्प्यात शेंगअळी आणि अवकाळीचा पाऊस यामुळे तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता.तुरीची काढणी होताच राज्यात हमीभाव केंद्र सुरु झाली होती. केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आला तर हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेत तुरीला 5 हजार 800 असा दर मिळत होता. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अवध्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेतील दरांनी हमीभाव ओलांडला होता. त्यामुळे यंदा तुरीला विक्रमी दर मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. पण केंद्राने तुरीच्या आयातीची मुदत वाढवली त्यामुळे वाढत्या दराला ब्रेक लागला आहे. एवढेच नाही तर आता दरात घट होऊ लागली आहे.
सोयाबीनच्या आवकमध्ये वाढ
अखेर चढ-उतारानंतर सोयाबीन हे 7 हजार 350 वर स्थिरावले आहे. गेल्या चार महिन्यातील बाजारपेठेची अवस्था पाहिल्यावर सोयाबीन हे 10 हजारापर्यंत पोहचणार नाही ही शेतकऱ्यांची भावना झाली आहे. गतवर्षी सोयाबीनला 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र, त्यावेळची स्थिती ही वेगळी होती. यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही असा दर मिळालेला नाही. त्यामुळे याच दरावर शेतकऱ्यांनी समाधान मानले आहे हे होत असलेल्या आवकवरुन लक्षात येत आहे. पण 7 हजार 350 हा दर सुध्दा चांगला असून शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं