Nanded : पावसाचा परिणाम थेट पीकविमा योजनेवर, शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा होणार का फायदा?

राज्यात सर्वाधिक खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा पेरण्या लांबल्याने पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे.

Nanded : पावसाचा परिणाम थेट पीकविमा योजनेवर, शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा होणार का फायदा?
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 11:56 AM

नांदेड : शेती व्यवसाय हा केवळ निसर्गावर अवलंबून आहे याचा प्रत्यय (Kharif Season) यंदाच्या खरिपातही आलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी पेरण्या रखडल्या तर पेरणी होताच अधिकच्या पावसाने (Crop Damage) पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न करुन पेरणीच्या टक्केवारीत वाढ केली पण अनिश्चित व अनियमित मान्सूनने सबंध खरिपाचेच गणित बिघडले आहे. आता याचा परिणाम थेट केंद्राच्या (Crop Insurance Scheme) पीकविमा योजनेवर होत आहे. आता पाऊस आणि योजनेचा सबंध काय असा सवाल तु्हाला पडला असेल पण नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे मुदत संपण्यापुर्वी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. शिवाय उर्वरित काळात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.

खरीप पिकांचे नुकसान

राज्यात सर्वाधिक खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा पेरण्या लांबल्याने पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे. पिकांचे नुकसान पाहता किमान विम्याच्या माध्यमातून तरी आर्थिक लाभ होईल ही आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

काय आहे योजनेची स्थिती?

पंतप्रधान पीकविमा योजना ही केंद्राच्या माध्यमातून सुरु असली तर राज्यात कृषी आणि महसूल विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंदा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे तर उर्वरित काळातही असाच ओघ राहील असा विश्वास आहे. तर राज्यात 39 लाख 21 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांना यापूर्वीच सहभाग नोंदवावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्याचे कारण काय?

दरवर्षी शेतकरी हे विमा योजनेकडे पाठ फिरवत असतात. यंदा मात्र, स्थिती ही वेगळी आहे. कारण हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचे स्वरुप समोर आले आहे. शिवाय अजूनही पावसाचा धोका कायम आहे. पिके पाण्यात असून जर नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान झाले तर आर्थिक मदत ही मिळणार. त्यामुळे उत्पादनातून नाही किमान आर्थिक मदतीमधून तरी दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसानीच्या खुणा अधिक गडद असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.