Egg Price : कडकनाथ नाही या कोंबडीचे अंडे आहेत सर्वात महाग, १०० रुपये आहे किंमत
असेही काही अंडे असतात की जे १०० रुपये किमतीला विकले जातात. शेतकरी कोंबडी पालन करून चांगली कमाई करू शकतात.
नवी दिल्ली : पावसाळा असो की उन्हाळा अंड्यांची मागणी असते. अंड्यांपासून तयार झालेला आमलेट लोकं पसंत करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांच्या अंड्यांची मागणी करतात. अंड्यांचे भावही वेगवेगळे आहेत. सहसा कोंबडीचे अंडे सहा ते १० रुपयांत मिळतात. पण, असेही काही अंडे असतात की जे १०० रुपये किमतीला विकले जातात. अशावेळी शेतकरी कोंबडी पालन करून चांगली कमाई करू शकतात.
बहुता पोल्ट्री फार्ममध्ये एका प्रजातीच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. एका अंड्याची किंमत सहा ते १० रुपये असते. परंतु, कडकनाथ कोंबडीचे अंडे आणि मांस दोन्हीची किंमत जास्त असते. कडकनाथच्या एका अंड्याची किंमत ३० ते ३५ रुपये आहे.
धोनीकडे कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय
कडकनाथच्या मांसाचा भाव बाजारात १ हजार ते दीड हजार रुपये किलो आहे. भारतात कडकनाथला महाग कोंबड्या समजल्या जातात. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. याव्यतिरिक्त भारतातील एक अशी कोंबडीची जाती आहे ज्या कोंबडीच्या अंड्याची किंमत १०० रुपये आहे.
कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही काळ्या रंगाची कोंबडी आहे. पंख, रक्त, मांसही काळे असते. या कोंबडीचे वजन सुमारे पाच किलो असते. काही राज्यात कडकनाथ पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाते.
असील कोंबडी वर्षाला ६० ते ७० अंडे देते
असीन कोंबडी सर्वात महाग मानली जाते. हिच्या एका अंड्याची किंमत सुमारे १०० रुपये असते. लोकं या कोंबडीचे मास कमी खातात. अंड्यांना मात्र मोठी मागणी असते. औषध म्हणून या कोंबडीचे अंडे खाल्ले जातात. शेतकऱ्यांनी असील जातीची कोंबडी पालन केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
एक कोंबडी वर्षभरात ६० अंडे देत असेल तरी त्याची किंमत सहा हजार रुपये होते. अशा २० कोंबड्यांचे पालन पोषण केल्यास एक लाख २० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकते.