Toor Crop : नोंदणी खरेदी केंद्रावर अन् तुरीची विक्री खुल्या बाजारात, शेतकऱ्यांच्या निर्यणायामागे कारण काय?
शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून नाफेडच्यावतीने देशभर हमीभाव केंद्र सुरु केली जातात. सध्या खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. गेल्या महिन्यांपासून ही खरेदी केंद्र सुरु असली तरी याला प्रतिसाद मात्र, कमीच राहिलेला आहे. आता तर खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री खुल्या बाजारात अशीच अवस्था झाली आहे. कारण हमीभाव केंद्रापेक्षा आता खुल्या बाजारातच तुरीला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलून खुल्या बाजारातच विक्रीला सुरवात केली आहे.
लातूर : शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून (NAFED) नाफेडच्यावतीने देशभर हमीभाव केंद्र सुरु केली जातात. सध्या खरीप हंगामातील (Toor Crop) तूर खरेदीसाठी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. गेल्या महिन्यांपासून ही खरेदी केंद्र सुरु असली तरी याला प्रतिसाद मात्र, कमीच राहिलेला आहे. आता तर खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री खुल्या बाजारात अशीच अवस्था झाली आहे. कारण हमीभाव केंद्रापेक्षा आता (Market) खुल्या बाजारातच तुरीला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलून खुल्या बाजारातच विक्रीला सुरवात केली आहे. हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर मिळत आहे तर बाजारात त्यापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला खरेदी केंद्रावरील दर अधिकचे होते पण आता चित्र बदलत आहे. हमीभाव केंद्रावर आवक तर कमी झाली आहेच पण नोंदणीचे प्रमाणही कमी झाले आहे.
नोंदणी केली मात्र बाजारातच
तुरीचे पीक पदरात पडताच बाजारपेठेत 5 हजार 800 तर खरेदी केंद्रावर 6 हजार 300 असा दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रथम केंद्रावर नोंदणीला सुरवात केली. गेल्या 15 दिवासांपासून आवक वाढली होती. पण आता बाजारपेठेतले दर वाढले आहेत. 6 हजार 500 पर्यंत दर मिळत असल्याने नियम-अटींमध्ये गुंतून न राहता शेतकरी खुल्या बाजारात विक्री करुन पैसे पदरी पाडून घेत आहे. शिवाय नोंदणी खरेदी केंद्रावर असली तरी त्याची पर्वा न करता आता थेट तुरीची विक्री करुन अधिकचा दर मिळवला जात आहे.
नियम-अटींचाही आवकवर परिणाम
नाफेडच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर कमी आर्द्रतेच्या शेतीमालाला प्राधान्य दिले जाते. शिवाय नोंदणी नंतर खरेदी केंद्रातून एसएमएस आला तरच शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन जाता येतो. अन्यथा वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. शिवाय केंद्रावरील नियमांचे पालन केल्यावर खरेदीयोग्य माल असल्यावर घेतला जातो अन्यथा परत पाठवला जातो. एवढेच नाही तूर खरेदी नंतर 8 दिवसांमध्य़े शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित आहे पण महिन्याभराच्या कालावधीनेही पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेतील रोकीच्या व्यवहाराकडे शेतकऱ्यांचे लक्ष अधिक आहे.
साठवणूकीवरही भर
यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि अंतिम टप्प्यात शेंगअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाप्रमाणेच तूरीचेही दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
संबंधित बातम्या :
दुष्काळात तेरावा : कांदा विक्री नंतरही मोबदला नाही, Solapur मध्ये 9 व्यापाऱ्यांवर कारवाई
केंद्र सरकारच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, यंदाच्या हंगामापासून Zero Budget शेतीचा प्रयोग
Latur Market : सोयाबीन दर स्थिरावले, अखेर शेतकऱ्यांनीही मनावर घेतले