नवी दिल्ली : लोकांना वाटते की, बिहारचे शेतकरी फक्त पारंपरिक शेती करतात. परंतु, असं काही नाही. बिहारचे शेतकरी इतर राज्यांतील शेतकऱ्यांसारखी आधुनिक शेतीत भाजीपाला लागवड करत आहेत. यामुळेच लिची, लांब भेंडी, मशरूम उत्पादनात बिहार देशात नंबर वन आहे. आता येथील शेतकऱ्यांनी सफरचंदाची शेती सुरू केली आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी सफरचंद विकून चांगली कमाई केली.
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात ऊन जास्त असते. पहाडी भाग असल्याने येथे उष्णता जास्त असते. तरीही काही शेतकऱ्यांनी येथे सफरचंदाची शेती केली. यापूर्वी या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती केली. चिल्हकी बिगाव गावातील शेतकरी ब्रजकिशोर मेहता यांनी सफरचंदाची शेती सुरू केली. आता त्यांनी १०० झाडं लावली आहेत. सर्व सफरचंदांना फळ येणं सुरू झालं आहे.
ब्रजकिशोर मेहता यांनी सांगितलं की, सफरचंदाची शेती करण्यापूर्वी त्यांनी समस्तीपूर येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं. सफरचंदाच्या शेतीतील बारकावे समजून घेतले. उद्यान विभागाने त्यांना अनुदानावर हरमन -९९ जातीची रोपं आणली. २५ ते ३० वर्षांची याची वयोमर्यादा असते. म्हणजे एकदा लागवड केल्यास २५ वर्षे उत्पादन घेता येते.
ब्रजकिशोर मेहता यांनी बिहारमध्ये सर्वात प्रथम स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. २०१२ मध्ये ६ रोप लावून सुरुवात केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये जास्त झालं लावली. त्यातून त्यांना चांगली कमाई होते. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
बरेच शेतकरी पारंपरिक शेती करतात. त्यात काही प्रगतशील शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. त्यात काहींना यश मिळते, तर काही अपयशी होतात. पण, प्रयत्न केल्यास कुठं ना कुठं यश मिळतोय. मेहनत आणि सातत्य असलं की, त्याच सक्सेस मिळतेच. असा या प्रगोगशील शेतकऱ्याचा प्रयोग आहे.