रासायनिक मुक्त शेतीकडं शेतकऱ्यांचा कल वाढला, सेंद्रिय केळी लागवडीचं प्रमाण वाढलं

BANANA NEWS : रासायनिक खतांच्या वापराला फाटा देत ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांनी पिकवली विषमुक्त केळी, स्वतः च नर्सरी तयार करून सेंद्रिय पद्धतीचा वापर करून रोपे तयार करतात. तिथल्या लोकांना ही पद्धत आवडल्यामुळे...

रासायनिक मुक्त शेतीकडं शेतकऱ्यांचा कल वाढला, सेंद्रिय केळी लागवडीचं प्रमाण वाढलं
nandurbar farmerImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:30 AM

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : शहादा (shahada) तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील अंशुमन पाटील (anshuman patil) हे गेल्या बारा वर्षापासून केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र हे करत असताना केळी लागवडीसाठी बाहेरून रोपं मागून लागवड (Banana crop) करत असताना रोपांवर पडणारी मर तसेच रोप आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे उत्पादनात घट येत असल्याने पाटील यांनी स्वतः नर्सरी तयार करून त्यातून सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार करून रेसिड्यू फ्री केळीचे उत्पादन घेत आहेत.

सेंद्रिय रोप 9 रुपयात तयार होत

केळी लागवड करण्यासाठी टिशू कल्चरच्या रोपांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे उत्पादन खर्च वाढत असला, तरी केळीवर येणाऱ्या विविध रोगराई यामुळे शेतकरी पाटील यांनी या सर्व बाबींचा विचार करत आपल्या शेतात नर्सरी तयार करून त्यात सेंद्रिय पद्धतीने रोप तयार केली. या सेंद्रिय केळी रोपांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आसून सेंद्रिय रोपांमध्ये मरच्या प्रमाणही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात होत असल्याचं पाटील सांगतात. सेंद्रिय पद्धतीने रोप तयार करण्यासाठी लागणारा खर्चही कमी असून टिशू कल्चरचे रोप घेतल्यास पंधरा रुपयापर्यंत मिळते, तर सेंद्रिय रोप 9 रुपयात तयार होत असल्याने त्यातही पैशांची बचत होते, असं अंशुमन पाटील यांनी सांगितलं.

रासायनिक घटक मुक्त पदार्थाचा दर्जा

पाटील यांनी आपल्या शेतात गेल्या दहा वर्षापासून सेंद्रिय पद्धतीच्या अवलंबन करून केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. असून यासाठी खत म्हणून हिरवळीच्या खतांचाही ते वापर करत असतात पाटील यांच्या शेतातच त्यांनी गांडूळ खताची निर्मिती केली असून त्यातील उत्पादित खताचा ते आपल्या शेतीसाठी वापर करत असतात लागवड केलेल्या केळीला २५ ते ३० किलो वजनाचा घट आला असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले असून त्यातून याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पाटील यांच्या शेतातील केळीचे दिल्ली येथील एका खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असून त्यात कुठल्याही प्रकारचा रसायनिक घटक आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचा रासायनिक घटक मुक्त पदार्थाचा दर्जा मिळाला असून त्याची विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचा पाटील सांगतात.

हे सुद्धा वाचा

पाटील यांच्यासोबत परिसरातील अनेक शेतकरी रासायनिक शेती सोडून आता सेंद्रिय केळी लागवडीकडे वळाले असून पाटील यांच्याकडून ते रोप आणि इतर वस्तू खरेदी करत असून त्यातून त्यांच्या उत्पादन वाढले असल्याचे शेतकरी सांगतात. रासायनिक खतांना फाटा देत पाटील यांनी ग्रामीण भागात सुरू केलेली रासायनिक मुक्त शेती हा उपक्रम आता चळवळ बनली असून ग्रामीण भागातील अनेक शेतकरी याकडे वळले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.