Jalgaon : वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट, फळ पिकामध्ये समावेश झाल्याने मिळणार का मदतीचा हात..!

हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीची जोपासणा केली पण 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. हे सर्व असले तरी तोडणीला आलेली केळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त होत आहे.

Jalgaon : वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट, फळ पिकामध्ये समावेश झाल्याने मिळणार का मदतीचा हात..!
वादळी वाऱ्याने जळगावमध्ये केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:16 PM

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून (Maharashtra) राज्यातील अनेक जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत असली तरी वादळी वाऱ्याची अवकृपाच म्हणावी लागेल. कारण सुरवातीला मराठवाडा, विदर्भ आणि आता जळगावात वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळी तोडणीला आली असतानाच हे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावल्याप्रमाणे सध्याची स्थिती आहे. खरिपासाठी पाऊस हा गरजेचा आहे पण वादळी वाऱ्यामुळे (Jalgaon) जिल्ह्यात अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब हे पडले आहेत तर अनेक गावचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे पावसाची आवश्यकता असली तरी बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त आहेत.  शिवाय केळी हे फळपिक असल्याची घोषणा मध्यंतरीच राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईत याचा काही उपयोग होईल का हे पहावे लागणार आहे.

उत्पादनाऐवजी चिखलाने माखलेली केळी उचलण्याची वेळ

हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीची जोपासणा केली पण 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. हे सर्व असले तरी तोडणीला आलेली केळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त होत आहे. जिल्ह्यात शेकडो एकरातील केळी बागा ह्या जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका भडगाव, चोपडा, अमळनेर, या तालुक्याती उत्पादकांना बसलेला आहे.

घरांची पडझड अन् जनावरेही दगावली

पावसापेक्षा वादळी वारे अधिक असल्याने नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यात वाऱ्याने 15 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतिही जिवीत हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसात जनावरांची देखील जिवीतहानी झाली आहे. नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाकडून पाहणी सुरू असून पंचनामे सुरू करण्यात आदेश देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

जळगाव जिल्ह्यात केळी हे मुख्य फळपिक आहे. शिवाय तोडणीला आलेल्या केळीचेच अधिकचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून केळी बागांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी थेट बांधावर दाखल होत आहेत. केळीचा आता फळ पिकात समावेश केल्याने अधिकच्या प्रमाणात नुकासनभरपाई मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. आता पंचनामे करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.