बांग्लादेशाने केली द्राक्षांच्या आयात शुल्कात वाढ, मग भारतातल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली, जाणून घ्या कारण
बांग्लादेशाने द्राक्षांच्या आयात शुल्कात वाढ केल्याने द्राक्ष बाजार भाव वीस रुपयांपर्यंत कोसळल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत ...
उमेश पारीक, नाशिक : गोड-आंबट चवीने संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या द्राक्षाचे (grapes) बाजारभाव कोसळले (Market rate) आहेत. बांग्लादेशने द्राक्षांच्या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे, परिणामी पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे भारतीय द्राक्ष उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (indian farmer) आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील रवींद्र बोरगुडे या तरुण शेतकऱ्यांने कांदा ,बाजारी,ज्वारी या पारंपरिक शेतीला फाटा देत घेतलेल्या शिक्षणाचा फायदा घेत द्राक्ष शेतीचे पीक घेण्याचे ठरवले. शेतकऱ्याने द्राक्ष पीक घेतले, मात्र दिवसेंदिवस द्राक्ष पिकाला लागणारा मजूर वर्गची कमतरता. तसेच रासायनिक खत, सततच्या बदलत्या हवामानाचा द्राक्षांना फटका यामुळे एक एकर द्राक्षाला जवळपास अडीच ते तीन लाख रुपये प्रमाणे सात एकर द्राक्षांना वीस ते एकवीस लाख रुपयांच्या जवळपास खर्च केला आहे.
बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्याने व्यापारी वर्ग देखील कमी भावात द्राक्ष विकत घेत असल्याने पन्नास ते पंचावन्न रुपये किलोला बाजार भाव मिळणे अपेक्षित होते. पण आज द्राक्षं वीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत कोसळल्याने केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने आता द्राक्ष शेती करावी का नाही असा प्रश्न उभा राहिला असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र बोरगुडे यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र सरकारने लक्ष देण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे.
शेतकरी संघटनेकडून आज राज्यभर आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून जात असलेल्या सुरत-शिर्डी महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर कांदे, द्राक्ष फेकून देत गळ्यात द्राक्ष व कांद्याच्या माळा घालून आंदोलनाला सुरुवात केली होती. कांद्याला चार ते पाच रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळत आहे. बांगलादेशाने आयात शुल्क वाढवले, बांगलादेशाकडून द्राक्ष खरेदी होत नसल्याने बाजार भाव कोसळले तसेच जिल्हा बँकेकडून जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्याने या निषेधार्थ एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोको करीत शासनाचे लक्ष वेधले यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती.