Yellow Watermelon : जे जे नवं ते बारामतीकरांना हवं, पिवळे कलिंगड पाहून काय म्हणाले मंत्री जयंत पाटील?

पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. केवळ बदलच नाहीतर काहीतरी वेगळे करुन ग्राहकांना भरुळ घालून उत्पन्न वाढवण्याचा फंडा आता राज्यात वाढत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढत आहेत त्याचप्रमाणे कलिंगडची आवकही वाढत आहे. पण यंदाच्या हंगामात चर्चा आहे तरी पिवळ्या कलिंगडाची. असाच प्रयोग बारामती तालुक्यातील मळद गावच्या प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षापासून त्यांनी पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेतले आहे.

Yellow Watermelon : जे जे नवं ते बारामतीकरांना हवं, पिवळे कलिंगड पाहून काय म्हणाले मंत्री जयंत पाटील?
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांने दिलेल्या पिवळ्या कलिंगडची मंत्री जयंत पाटील यांनी चवही चाखली आणि त्यांचे कौतुकही केले.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:00 PM

मुंबई :  (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. केवळ बदलच नाहीतर काहीतरी वेगळे करुन ग्राहकांना भरुळ घालून उत्पन्न वाढवण्याचा फंडा आता राज्यात वाढत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढत आहेत त्याचप्रमाणे (Watermelon Arrival) कलिंगडची आवकही वाढत आहे. पण यंदाच्या हंगामात चर्चा आहे तरी (Yellow Watermelon) पिवळ्या कलिंगडाची. असाच प्रयोग बारामती तालुक्यातील मळद गावच्या प्रल्हाद गुलाबराव वरे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षापासून त्यांनी पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेतले आहे. यावेळी त्यांनी या वेगळ्या आणि चवीला गोड असणारे कलिंगड थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राज्याच्या राजधानीत नेऊन दिले आहे. शिवाय जयंत पाटलांनी या अभिनव उपक्रमाचे तर कौतुक केलेच पण जे जे नवं ते बारामतीकरांना हव असं म्हणत याबाबतीत बारामतीकरांचा हातखंडा चांगला असल्याचे म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पिवळे कलिंगड मूळचे तैवानचे

यंदाच्या हंगामात बाजारपेठेत पिवळे कलिंगडही दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादनात बदल करुन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हिरव्या कलिंगडप्रमाणेच हे पिवळे कलिंगड चवीला गोड आहे. याचे मूळ उत्पादन हे तैवान येथे घेतले जाते. असे असले तरी बारामती तालुक्यातील प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षापासून अशा पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेत आहेत. जास्त गर, चवीला गोड आणि दिसायला वेगळेच असल्याने याला बाजारभावही अधिकाच मिळत आहे. उत्पादनाबरोबर उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून यंदा तर पोषक वातावरणामुळे तो साध्य होताना पाहवयास मिळत आहे.

जयंत पाटलांनी चवही चाखली अन् कौतुकाची थापही दिली

प्रल्हाद वरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन पिवळे कलिंगड त्यांना दिले. शेतकऱ्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्यांनी कौतुक तर केलेच पण शेतीमध्ये जगापेक्षा वेगळं करण्याचा बारामतीकरांकडे चांगलाच हातखंडा असल्याचे सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवरच भर न देता आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. वाढीव उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचा अभ्यास घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे गरजेचे झाले असल्याचे सांगितले. पण या पिवळ्या कलिंगडाची चव काही औरच आहे म्हणत उत्पादन प्रक्रियेबाबात विचारपूसही केली. त्यांनी वरे यांचे कौतुकही केले.

कृषी विज्ञान केंद्राचा आधार, इतर शेतकरीही प्रेरीत

प्रल्हाद वरे हे गेल्या चार वर्षापासून अशा पिवळ्या कलिंगडचे उत्पादन घेत असले तरी त्यांचा हा प्रयोग यंदा सर्वासमोर आला आहे. जास्त गर आणि चवीला गोड असणाऱ्या या कलिंगडालच्या वाढीसाठीही अडीच महिन्याचाच कालावधी लागतो. शिवाय उत्पादन प्रक्रिया ही हिरव्या कलिंगडाप्रमाणेच आहे. वरे हे गेल्या 30 वर्षापासून शेतीक्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीसाठी त्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ, वाढत्या उन्हाचा काय परिणाम?

Vineyard : उत्तर महाराष्ट्रात नुकसान तरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धाडस, म्हणे उसापेक्षा द्राक्षाला गोडवा

Sindhudurg : अवकाळी मुळावर, सर्वकाही हिरावूनही अणखी दोन दिवस धोक्याचेच, आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.