टरबूज, खरबुजाची शेती, 70 दिवसात 8 लाख कमवले; वाचा जिगरबाज शेतकरी दाम्पत्याची कहाणी

दाम्पत्याने फक्त 70 दिवसांता टरबूज, खरबुजाच्या शेतीतून तब्बल 8 लाख रुपये कमविले आहेत. (beed farmer melon watermelon farming)

टरबूज, खरबुजाची शेती, 70 दिवसात 8 लाख कमवले; वाचा जिगरबाज शेतकरी दाम्पत्याची कहाणी
या शेतकरी दाम्पत्याने टरबूज आणि खरबुजाची शेती केली.
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 5:05 PM

बीड : मराठवाडा हा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. परभणी, लातूर, नांदेड, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. येथील शेतकरी कायम पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्यामुळे येथे सिंचनाच्या मोठ्या अडचणी आहेत. याच कारणामुळे येथील शेतकरी कायम चिंताग्रस्त आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती असूनसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यानंतर चांगला नफा मिळू शकतो याचं उदाहरण बीडमधील आष्टी तालुक्यातील एक दाम्पत्य ठरतंय. या दाम्पत्याने फक्त 70 दिवसांत टरबूज, खरबुजाच्या शेतीतून तब्बल 8 लाख रुपये कमविले आहेत. त्यांच्या या यशामागे जिद्द आणि राबण्याची तयारी असल्याचं हे शेतकरी दाम्पत्य सांगतं. (Beed farmer farmed Melon and Watermelon and earned 8 lakh rupees)

एकूण चार एकरावर टरबूज, खरबुजाची लागवड

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कमी उत्पादन क्षेत्राचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकरी दाम्पत्याने टरबूज आणि खरबूज पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यानी 8 लाखांची घसघशीत कमाई केली आहे. वंदना आणि हनुमंत जाधव असे या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याने दीड एकर शेतामध्ये टरबूज आणि अडीच एकरावर खरबूज या फळाची लागवड केली होती. दिवसरात्र मेहनत केल्यानंतर अवघ्या 70 दिवसांत हे पीक आले.

लॉकडाऊमुळे बाजारपेठ मिळाली नाही

या दाम्पत्याने आपल्या एकूण चार एकर शेतावर टरबूज आणि खरबूज लावले होते. त्यांनी लागवणीपासून दिवसरात्र मेहनत करुन आपल्या शेतात या फळांचे अतिशय चांगले उत्पादन घेतले. फक्त 70 दिवसांत हे पीक आल्यामुळे आता चांगली कमाई होईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, अचनाक पुन्हा नव्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तसेच बाजारपेठेमध्ये वेगवेगळे निर्बंध आल्यामुळे या शेतकरी दाम्पत्याला आपल्या टरबूज आणि खरबुजांना योग्य बाजारपेठ मिळू शकली नाही. मात्र, हतबल न होता त्यांनी थेट घरासमोरच फळ विकण्यास सुरुवात केली. त्यांनी या काळात कोरोनाचे सर्व नियम पाळून टरबूज आणि खऱबूज विकण्याचा उत्तम व्यवसाय केला. कोणत्याही मोठ्या बाजरपेठेची वाट न पाहता त्यांनी एक-एक टरबूज विकून चक्क 8 लाख रुपये कमावले.

दरम्यान, शेतकरी दाम्पत्याच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल तर शेतकरी विक्रमी नफा मिळवू शकतो, असे अनेकजण या शेतकरी दाम्पत्याकडे पाहून म्हणत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बोलताना मित्र परिवाराच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी फळं कापून वाढदिवस साजरा करावा. ज्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैशांची मदत होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

‘शुगर फ्री पेरु’ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

पीकविम्याच्या जाचक अटी, अतिवृष्टीने फळबागा उद्ध्वस्त तरीही मदत नाही, शेतकरी हैराण

आधीच कोरोना, लॉकडाऊनची भीती, टोमॅटोला 5 रुपयांचा भाव; उद्विग्न शेतकऱ्याने उचलले मोठे पाऊल

(Beed farmer farmed Melon and Watermelon and earned 8 lakh rupees)

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.