Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar : शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नााला बगल, उर्जा राज्यमंत्र्यांकडून उलट महावितरणचे कौतुक

राज्यात मुख्यमंत्री सौरउर्जा योजना राबवली जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवासा विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले आहे. कृषी उर्जा अभियानाचा शेतकऱ्यांना लाभ झालेलाच आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकीचा 50 टक्के भरणा केल्याने त्यामध्येही 50 टक्के सवलत मिळाली होती.

Ahmednagar : शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नााला बगल, उर्जा राज्यमंत्र्यांकडून उलट महावितरणचे कौतुक
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 4:22 PM

अहमदनगर : रब्बी हंगामाच्या सुरवातीपासून शेतीसाठी दिवसा विद्युतपुरवठा करण्याची मागणी विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, हंगाम संपला तरी ही मागणी पूर्ण झालेली नाही. असे असतानाच उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा या प्रश्नावर तर सावरासवर केलीच पण महावितरण कंपनीने यंदा योग्यरित्या परस्थिती हाताळल्याने राज्य भारनियमापासून बचावले असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मध्यंतरी केवळ सुरळीत विद्युत पुरवठा झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे सध्या उत्पादनात घट झाल्याचे समोर येत आहे. असे असतानाच लोकप्रतिनीधींकडून अशी सावरासावर केली जात आहे.

मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेतून मिळणार ‘उर्जा’

राज्यात मुख्यमंत्री सौरउर्जा योजना राबवली जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवासा विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले आहे. कृषी उर्जा अभियानाचा शेतकऱ्यांना लाभ झालेलाच आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तसेच मार्च 2022 पर्यंतच्या थकबाकीचा 50 टक्के भरणा केल्याने त्यामध्येही 50 टक्के सवलत मिळाली होती. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना तब्बल 30 हजार 450 कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोळसा टंचाईमुळे भारनियमनाची नामुष्की

राज्यात कोळश्याची टंचाई निर्माण झाल्याने भारनियमन करण्याची नामुष्की ओढावली होती. मात्र, यामध्येही ज्या भागात नियमित वीजबील अदा केले जाते त्या भागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात आला होता आणि ज्या भागामध्ये वीजचोरी केली जाते त्याच भागात अधिकचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनीही नियमित वीजबिल भरणा करणे गरजेचे आहे. तरच विद्युत पुरवठा सुरळीत राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

महावितरणमुळेच भारनियमन टळले

सबंध राज्यात महावितरणबाबत रोष व्यक्त केला जात असताना मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी महावितरणमुळेच राज्यावरील भारनियमनाचे संकट टळल्याचे सांगितले. शिवाय प्रतिकूल परस्थितीमध्ये योग्य कारभार हाकल्याने नाररिकांना समस्यांना सामोरे जावे लागले नाही. दरवर्षी अशीच परस्थिती राहिली तर मात्र, न टाळता येणारे संकट उभे राहणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्याचे आवाहन त्यांनी शिर्डीत केले आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.